लसीकरण बॅनरमध्ये मुख्यमंत्र्यांचा फोटो वगळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 12:25 PM2021-01-17T12:25:16+5:302021-01-17T12:25:26+5:30

Buldhana News शिवसैनिकांनी संताप व्यक्त करीत या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सांना भर रस्त्यात घेराव घालतह बॅनर काढण्यास भाग पाडले.

The photo of the CM was remove from the vaccination banner | लसीकरण बॅनरमध्ये मुख्यमंत्र्यांचा फोटो वगळला

लसीकरण बॅनरमध्ये मुख्यमंत्र्यांचा फोटो वगळला

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : कोविड-१९ विषाणूविरूध्द लढणाऱ्या ऐतिहासीक लसीकरण मोहिमेस १६ जानेवारीपासून सर्वत्र सुरूवात झाली. चिखलीतही या लसीकरणाचा शुभारंभ स्थानिक ग्रामीण रूग्णालयात पार पडला. मात्र, या लसीकरणाच्या शुभारंभासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकारे यांचा फोटो वगळल्याने शिवसैनिकांनी संताप व्यक्त करीत या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सांना भर रस्त्यात घेराव घालतह बॅनर काढण्यास भाग पाडले.
देशभरात कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. चिखली ग्रामीण रूग्णालयातही या लसीकरणाचा शुभारंभ स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्ते करण्यात आले. मात्र, यानुषंगाने ग्रामीण रूग्णालयात लावण्यात आलेल्या शुभारंभाच्या बॅनरवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा फोटो टाकण्यात आलेला नव्हता. ज्या महाराष्ट्रात ही लस तयार झाली, त्याच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा फोटो नसल्याची बाब शिवसैनिकांना कळताच शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेत स्थानिक ग्रामीण रूग्णालयात धडक दिली. लसीकरणाच्या शुभारंभासाठी ग्रामीण रूग्णालयात उपस्थित जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नितीन तडस, आर.एम.ओ. जी.आर.मकानदार, डॉ.घोलप, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.इम्रान खान आणि वैद्यकीय अधिक्षक डॉ.खान यांना संतप्तपणे रस्त्यावर घेराव घातला. त्यानंतर या प्रकरणाचा तीव्र रोष व्यक्त करीत याप्रकरणी जाब विचारला.  पुन्हा अशी चूक झाल्यास गंभीर परिणामाला सामोरे जाण्यास तयार राहण्याचा इशारा यावेळी तालुकाप्रमुख कपिल खेडेकर यांनी दिला. शिवसैनिकांव्दारे   शुभारंभाचा बॅनर देखील हटविण्यात आला. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव देशमुख, तालुकाप्रमुख कपिल खेडेकर, शहरप्रमुख श्रीराम झोरे, युवसेना तालुका प्रमुख नंदू कऱ्हाडे, प्रितम गैची, रवी पेटकर, बंटी गैची, दीपक सोनवाल आदी उपस्थित हाेते. 

Web Title: The photo of the CM was remove from the vaccination banner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.