कळसूबाईच्या शिखरावर फडकविला बुलडाण्याच्या समाधानने तिरंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:30 IST2021-02-05T08:30:39+5:302021-02-05T08:30:39+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील शिंदी येथील समाधान बंगाळे हा एका पायाने दिव्यांग आहे. शिव ऊर्जा प्रतिष्ठान औरंगाबाद संस्थेचे ...

Phadakvila on the summit of Kalsubai with the satisfaction of a bulldozer | कळसूबाईच्या शिखरावर फडकविला बुलडाण्याच्या समाधानने तिरंगा

कळसूबाईच्या शिखरावर फडकविला बुलडाण्याच्या समाधानने तिरंगा

बुलडाणा जिल्ह्यातील शिंदी येथील समाधान बंगाळे हा एका पायाने दिव्यांग आहे. शिव ऊर्जा प्रतिष्ठान औरंगाबाद संस्थेचे अध्यक्ष शिवाजी गाडे यांनी संस्थेच्या वतीने दिव्यांगासाठी ही मोहीम आयोजित केली होती. गाडे हे स्वतः दिव्यांग असून दिव्यांगांच्या कल्याणासाठी झटत आहेत. दिव्यांग कल्याण संघटनेत समाधान बंगाळे हा काम करीत असल्याने आपणही कळसूबाई शिखर पार करू शकतो, अशी जिद्द मनाशी बाळगून त्याने शिवाजी गाडे यांच्याशी संपर्क साधला. या मोहिमेत जिल्ह्यातून एकमेव समाधान बंगाळे हा दिव्यांग तरुण सहभागी झाला. २६ जानेवारीला संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिनाला ध्वजारोहण सुरू असताना इकडे महाराष्ट्रातील १९ अपंग हातात तिरंगा घेऊन गड सर करीत होते. समाधान एका पायाने दिव्यांग असतानाही काठीचा (कुबडीचा) सहारा घेत सकाळी ५:३० वाजता शिखर चढण्यास सुरुवात केली आणि पाहता पाहता सकाळी १०:३० वाजता १९ अपंग युवकांनी शिखराचा माथा सर केला. ६ तासाचा खडतर प्रवास करत १९ अपंग सहकाऱ्यांनी महाराष्ट्रातील १,६४६ मीटर उंचीचे सर्वोच्च शिखर सर केले आणि माथ्यावर भारत देशाचा तिरंगा डौलाने फडकविला. याबद्दल समाधान बंगाळे याला प्रशस्तिपत्र व गोल्ड मेडल देऊन संस्थेच्या वतीने त्याचा सन्मान करण्यात आला. शिंदीसारख्या खेडेगावातून येऊन जिल्ह्याचा नावलौकिक वाढविल्यामुळे समाधानवर संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Web Title: Phadakvila on the summit of Kalsubai with the satisfaction of a bulldozer