तपोवन येथेही दारूबंदीचा ठराव
By Admin | Updated: August 31, 2014 00:43 IST2014-08-31T00:39:54+5:302014-08-31T00:43:31+5:30
मोताळा तालुक्यातील तपोवन येथील महिलांनी गावात दारुबंदीचा ठराव केला आहे.

तपोवन येथेही दारूबंदीचा ठराव
मोताळा : तालुक्यातील पिंपळगाव देवी येथील महिलांनी दारुबंदीविरुद्ध एल्गार पुकारत गावातील देशी दारूचे दुकान बंद करण्यास प्रशासनाला भाग पाडले. आता तपोवन येथील ग्रामपंचायत सदस्या मिनाबाई अजय पाटील यांनी पुढाकार घेत गावात दारुबंदीचा ठराव ग्रामसभेत केला आहे.तपोवन येथे अवैध दारूविक्री मोठय़ा प्रमाणावर होत आहे. दारुचे व्यसन तरुण पिढीला जडू लागले आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. व्यसनामुळे घरोघरी भांडणतंटे, वादविवाद होऊ लागले आहेत. गावातील शांतता अबाधित राहण्यासाठी दारूविक्री तात्काळ बंद करण्यात यावी, अशी सूचना ग्रामपंचायत सदस्य मिनाबाई पाटील यांनी ग्रामसभेत मांडली. यावर चर्चेअंती ठराव सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला. यांची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.