कापड दुकान फोडणाऱ्यास अटक, आणखी दोघांचा शोध सुरू
By सदानंद सिरसाट | Updated: September 13, 2022 19:27 IST2022-09-13T19:27:29+5:302022-09-13T19:27:39+5:30
चोरी केलेल्या कपड्यांचा माल जप्त

कापड दुकान फोडणाऱ्यास अटक, आणखी दोघांचा शोध सुरू
खामगाव : येथील वामननगर रोडवरील कपड्याचे दुकान फोडणाऱ्या टोळीतील चोरट्यास पोलिसांनी काही तासांतच अटक केली. त्याच्या ताब्यातून चोरी केलेला कपड्यांचा साठा जप्त करण्यात आला. पोलिसांनी दोन चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.
इंदिरा गांधी कॉम्प्लेक्समधील दुकान फोडून चोरट्यांनी त्यातील ४ लाखांचा कपड्यांचा माल लंपास केला होता. याप्रकरणी दुकान मालकाने शहर ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली. तपास सुरू केला. पोलिसांनी दुकान परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले. त्याआधारे हरीफैलातील चेतन विजय कळस्कर (१९) याला अटक केली. त्याच्या ताब्यातून चोरी केलेला कपड्यांचा माल जप्त केला. चेतन कळस्कर याच्यासह तिघांनी ही चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलीस उपनिरीक्षक सोळंके, फासे, तडवी, दिनेश इंगळे, अंकुश गुरुदेव, सुनील शेगोकार चोरट्यांचा शोध घेत आहेत.