जि.प.च्या १८९ कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:37 IST2021-04-23T04:37:13+5:302021-04-23T04:37:13+5:30
प्रदीर्घ कालावधीपासून कर्मचाऱ्यांचीही प्रकरणे प्रलंबित होती. त्यासाठी कर्मचारी संघटनांनी सातत्यपूर्ण लढा दिला होता. सततच्या या पाठपुराव्याची दखल घेत जिल्हा ...

जि.प.च्या १८९ कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती
प्रदीर्घ कालावधीपासून कर्मचाऱ्यांचीही प्रकरणे प्रलंबित होती. त्यासाठी कर्मचारी संघटनांनी सातत्यपूर्ण लढा दिला होता. सततच्या या पाठपुराव्याची दखल घेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी कर्मचाऱ्यांची ही मागणी त्वरेने मान्य करत नवीन आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांना एकप्रकारे गुढीपाडव्याची भेट दिल्याची भावना संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेश वाईंदेशकर आणि जिल्हा सरिटणीस विजय तांदुळकर यांनी व्यक्त केली.
कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगतीचा अर्थात कालबद्ध पदोन्नतीचा हा लाभ आता मिळणार आहे. प्रामुख्याने सहायक प्रशासन अधिकारी (१), कनिष्ठ प्रशासन अधिकारी (३), वरिष्ठ लिपिक (३५), कनिष्ठ लिपिक (४६), वाहनचालक (१), विस्तार अधिकारी (सांख्यिकी) (१) व परिचर (१०३) अशा विविध संवर्गातील सुमारे १८९ कर्मचाऱ्यांना या कालबद्ध पदोन्नतीचा लाभ होणार आहे. जि. प. सीईअेा भाग्यश्री विसपुते यांनी कर्मचाऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून एकाच वेळी हा लाभ दिला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश वाईंदेशकर, जिल्हा सरचिटणीस विजय तांदुळकर, गजानन गायकवाड, गजानन सावंत, जगदीश पळसकर, सुधाकर तायडे, एम. पी. सोनुने, राहुल कासारे यांच्यासह जिल्हा परिषदेमधील अन्य कर्मचारी उपस्थित होते.