ग्रामीण भागातील मतदानाचा टक्का वाढला

By Admin | Updated: October 16, 2014 00:49 IST2014-10-16T00:49:11+5:302014-10-16T00:49:11+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात ग्रामीण भागातील मतदानात वाढ.

The percentage of voting in rural areas increased | ग्रामीण भागातील मतदानाचा टक्का वाढला

ग्रामीण भागातील मतदानाचा टक्का वाढला

बुलडाणा : विधानसभा निवडणुकीसाठी आज झालेल्या मतदान प्रक्रियेत सातही मतदान केंद्रातील ग्रामीण भागात मतदानाची टक्केवारी वाढलेली दिसून आली. शासनातर्फे राबविण्या त आलेल्या मतदान जागृती अभियान मोठय़ा प्रमाणात राबविण्यात आल्याचा परिणाम या निवडणुकीत दिसून आला. तर शासनाच्या मतदानासाठी सुटी देण्याच्या धोरणामुळेही म तदानात वाढ झाल्याचे दिसून आले. देऊळघाट येथे एकूण १३७७६ पैकी ७७८१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. याची टक्केवारी ५९.६0 इतकी नोंदविली गेली. दिवठाणा येथे १ हजार १८१ पैकी ९८६ मतदारांनी मतदान केले. त्याची टक्केवारी ८२.१५ टक्के आहे. देऊळगावमही येथे ७ हजार २१७ पैकी ४ हजार ३८८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मलकापूर पांग्रा येथे ३ हजार ९११ पैकी २ हजार ६६२ मतदारांनी मतदान केले. याची टक्केवारी ६७ टक्के आहे. दुसरबीड येथे ६ हजार ३२१ पैकी ३ हजार ७७३ लोकांनी मतदान केले. एकूण ५९.६९ टक्के मतदान झाले. डोमरूळ येथे ६४ टक्के मतदान झाले. तर डोणगाव येथे १३ हजार ६२६ मतदारांपैकी ७ हजार ९६२ मतदारांनी मतदान करून ५९.६३ टक्के मतदान नोंदविले. पांग्रीमाळी येथे ६९.९0 टक्के मतदान नांदविले गेले. जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा या गावात जनतेने मतदानाला उ त्स्फुर्त प्रतिसाद देत ८0.८३ असे विक्रमी मतदान नोंदविले. मोताळा येथे सायंकाळी ५.३0 वाजेनंतर मतदान प्रक्रिया सुरू होती. यावेळेपर्यंत ५८ टक्के मतदान नोंदवले गेले. सायंकाळ नंतरही मतदान प्रक्रिया सुरू होती त्यामुळे मतदानात वाढ झाल्याचे दिसून आले.

Web Title: The percentage of voting in rural areas increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.