शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पैनगंगेवर बंधारे उभारणार; तांत्रिक बाबी तपासण्याचे जलसंपदा विभागाला निर्देश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 00:16 IST

बुलडाणा : अजिंठा पर्वतराजीत उगम पावणार्‍या पैनगंगा नदीवर बुलडाणा जिल्ह्यातील ९0 किलोमीटर लांबीपेक्षा अधिक भागात ठिकठिकाणी गेटचे बंधारे उभारण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. त्यानुषंगाने जलसंपदा आणि जलसंधारण विभागाने तांत्रिक बाबी तपासण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत.

ठळक मुद्देनदीवर आठ ‘मायनर टँक’भूसंपादनाची गरज नाही

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : अजिंठा पर्वतराजीत उगम पावणार्‍या पैनगंगा नदीवर बुलडाणा जिल्ह्यातील ९0 किलोमीटर लांबीपेक्षा अधिक भागात ठिकठिकाणी गेटचे बंधारे उभारण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. त्यानुषंगाने जलसंपदा आणि जलसंधारण विभागाने तांत्रिक बाबी तपासण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत.दोन दिवसांपूर्वी नागपूर येथे बुलडाणा जिल्ह्याची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी यासंदर्भातील सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आहेत. येत्या २३ डिसेंबरला किसान दिन देशात साजरा केला जातो. त्यानुषंगाने शेतकर्‍यांना सिंचन सुविधांसह पीक पाण्यात काय बदल झाला, यासंदर्भाने आढावा घेण्याचा  प्रयत्न केला असता, ही माहिती समोर आली नाही.पैनगंगा नदीवर बुलडाणा जिल्ह्यात विशेषत: बुलडाणा विधानसभा मतदार संघात २0 बंधारे उभारण्याबाबतचा प्रस्ताव होता. त्यानुषंगाने मध्यंतरी चाचपणीही झाली होती. हा मुद्दा आता आणखी पुढे सरकला असून, त्यासंदर्भात तांत्रिक बाबी तपासण्याच्या या सूचना दिल्या गेल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले. अवर्षण प्रवण भागात यातील काही भाग येत असल्याने हे बंधारे प्रत्यक्षात अस्तित्वात आल्यास या भागातील शेतकर्‍यांना शेती सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न फारसा उद्भवणार नाही. आता जलसंपदा विभागाच्या अहवालाकडे लक्ष लागून आहे.

नदीवर आठ ‘मायनर टँक’साधारणत: ३५0 ते ४५0 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकले असते. जवळपास आठ मायनर टँक (छोटे तलाव) पैनगंगा नदीवर यापूर्वी उभारण्यात आलेले आहेत. त्यातून लगतच्या शेतीला वर्षभर नाही तरी किमान आठ महिने सिंचनाचा लाभ होतो. त्याची व्याप्ती वाढवून मोठय़ा स्तरावर हे बंधारे उभारल्या गेल्यास परिसरातील शेतीला सिंचनाच्या पाण्याचा लाभ होऊ शकतो. त्याबाबतची ही शक्यता तपासण्यात येणार आहे.

भूसंपादनाची गरज नाही४हे बंधारे उभारताना त्यासाठी शेतकर्‍याची जमीन संपादित करण्याचा मुद्दा उपस्थित होत नाही. नदीपात्रातच  हे पाणी बंधार्‍याद्वारे साठवता येणे शक्य आहे. नदी पात्रालगतची एखाद दोन फूट जमीन एखाद वेळेस यामुळे प्रभावित होईल; मात्र मोठय़ा प्रमाणावर भूसंपादन करण्याची यात गरज नसल्याचेही संकेत मिळाले आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाriverनदी