अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार
By Admin | Updated: October 29, 2014 00:23 IST2014-10-29T00:23:56+5:302014-10-29T00:23:56+5:30
मेहकर येथील घटना.

अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार
मेहकर (बुलडाणा) : एका अज्ञात वाहनाच्या धडकेने ६५ वर्षीय पादचारी जागेवरच ठार झाल्याची घटना २७ ऑक्टोबरच्या रात्री स्थानिक प्रताप सिनेमागृहाजवळ घडली. येथील प्रभाग क्रमांक ५ मधील रहिवासी व एसटी महामंडळातील सेवानवृत्त कर्मचारी सुरेश भगवान गिरी (६५) हे आपल्या घरून रात्री जेवण करून फिरायला बाहेर पडले. घरी परत येत असताना येथील प्रताप सिनेमागृहासमोर एका अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. त्यात गिरी यांच्या छातीला व डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यासंदर्भात मेहकर पोलिस स्टेशनला फिर्याद देण्यात आली असून, पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मेहकर पोलिस करीत आहेत.