अंढेरा पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:41 IST2021-02-17T04:41:04+5:302021-02-17T04:41:04+5:30
यावेळी अंढेरा पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या ४८ गावांमधील पोलीस पाटील, सरपंच व शिवजयंतीचे आयोजक मोठ्या संख्येने हजर होते. राज्यात ...

अंढेरा पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची सभा
यावेळी अंढेरा पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या ४८ गावांमधील पोलीस पाटील, सरपंच व शिवजयंतीचे आयोजक मोठ्या संख्येने हजर होते.
राज्यात पुन्हा एकदा कोरोनासारख्या भयानक आजाराने डोके वर काढल्यामुळे काही भागात पुन्हा निर्बध लावल्यामुळे खबरदारी घेत शिवजयंती ही साध्या पद्धतीने साजरी करावी. शिवजयंतीला गावामध्ये मिरवणूक काढू नये. जयंती साजरी करतेवेळेस दहापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमू नये. फिजिकल डिस्टन्सिंग तसेच सॅनिटायझर व मास्कचा वापर करावा. सर्वांनी शांततेतच जयंती साजरी करावी, असे आवाहन ठाणेदार राजवंत आठवले यांनी केले. यावेळी उगले, समाधान झिने, पोफळे हे पोलीस कर्मचारी तथा सर्व पत्रकार मंडळी हजर होती. कार्यक्रमाचे आभार पत्रकार स्वप्निल शिंदे यांनी मानले.