आधी ॲडव्हान्स भरा, मगच उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:34 IST2021-04-08T04:34:54+5:302021-04-08T04:34:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, शासकीय रुग्णालयांबरोबर खासगी रुग्णालये रुग्णांनी फुल झाली आहेत. ...

Pay in advance first, then treatment | आधी ॲडव्हान्स भरा, मगच उपचार

आधी ॲडव्हान्स भरा, मगच उपचार

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, शासकीय रुग्णालयांबरोबर खासगी रुग्णालये रुग्णांनी फुल झाली आहेत. अनेक खासगी रुग्णालये रुग्ण दाखल होताच रुणाची प्रकृती स्थिर करण्यास प्राधान्य देतात; परंतु काही खासगी रुग्णालये पैसे भरल्याशिवाय रुग्णास भरती करून घेत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. तसेच बहुतांश रुग्णालयांत २४ तासांत डिपॉझिटची रक्कम भरण्यास सांगितली जाते.

त्यामुळे नातेवाइकांना पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी धावाधाव करावी लागते. खासगी रुग्णालयांत ८० टक्के खाटा कोरोना रुग्णांसाठी ठेवण्याची सूचना शासनाने केली आहे. त्यासाठी आकारण्यात येणारे दरही निश्चित केले आहेत. उर्वरित २० टक्के खाटा अन्य रुग्णांसाठी आणि जे कोरोना रुग्ण खासगी सुविधा घेऊ इच्छितात, त्यांच्यासाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या पाच हजारांवर गेली आहे. दररोज एक हजारांवर नव्या कोरोना रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांत भरती होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. अशावेळी आयसीयु बेड नाही, व्हेंटिलेटर नाही यासह दाखल करून घेण्याआधीच आणि उपचार सुरू असून, अनेक रुग्णालये पैसे भरण्यास सांगत असल्याची ओरड होत आहे. याकडे जिल्हा प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.

---

ऑनलाईन व्यवहाराला खो!

खासगी रुग्णालयात नातेवाइकाला भरती केले. विमा होता. त्यापुळे कॅशलेस

उपचार मिळतील, अशी अपेक्षा होती; परंतु रुग्णालयाने पैसे भरण्यास

सांगितले. त्यामुळे ऐनवेळी पैसे जमा करावे लागले. कॅशलेस उपचार म्हटले,

तर कॅशलेस उपचार मिळाले पाहिजेत. त्यात सुधारणा होण्यासाठी

रुग्णालयांनीही पुढाकार घ्यावा, असे एका रुग्णाच्या नातेवाइकाने सांगितले.

---

शासकीय दर कठीणच

खासगी रुग्णालयांत आयसोलेशन

वॉर्डसाठी रोज चार हजार रुपये,

आयसोलेशन आयसीयू विदाऊट

व्हेंटिलेटरसाठी रोज ७ हजार ५०० आणि आयसोलेशन

आयसीयू विथ व्हेंटिलेटरसाठी रोज

नऊ हजार रुपये शुल्क आहे.

त्याशिवाय महागडी औषधी,

तपासण्या, पीपीई कीटचा खर्च

वेगळा आहे. ८० टक्के खाटांसाठी

हा दर असल्याचे सांगण्यात आले.

खासगी रुणालयाचे

दर डोळे पांढरे करणारे

ज्यांना वॉर्डात राहायचे नसते, स्वतंत्र

रूममध्ये थांबायचे असते, अशा

रुग्णांसाठी वेगळे दर आकारण्यात

येत आहेत. स्वतंत्र कक्षात

ऑक्सिजन बेडसाठी ५ हजार ५०० ते

६ हजार ५०० रुपयांपर्यंत शुल्क

आकारण्यात येते, तर दोन रुग्णांच्या शेअरिंग रूमसाठी चार हजार

५०० ते पाच हजार रुपये मोजावे

लागतात.

--------

Web Title: Pay in advance first, then treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.