आॅटोरिक्षा व टॅक्सी परवाने देण्याचा मार्ग खुला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 13:28 IST2017-07-31T13:28:40+5:302017-07-31T13:28:40+5:30

आॅटोरिक्षा व टॅक्सी परवाने देण्याचा मार्ग खुला
जिल्हा वाहतूक सेनेच्या प्रयत्नांना यश
बुलढाणा: तीन व चार चाकी आॅटोरिक्षाचे परवाने देण्याबाबत शासन निर्णय
झाला असून अनेक दिवसांपासून बंद असलेले परवाने देण्याचा मार्ग खुला झाला
आहे.
गत अनेक वर्षांपासून तीन व चार चाकी आॅटोरिक्षा व टॅक्सी परवाने देणे बंद
असल्याने अनेक सुशिक्षित बेरोजगार यानी लाखो रुपये खर्च करून, कर्ज काढून
तीन व चार चाकी आटोरिक्षा व टॅक्सी घेऊन ठेवलेल्या आहेत. परंतु परवाने
नसल्याने त्या उभ्या होत्या. याबाबत बुलडाणा जिल्हा शिववाहतुक सेनेचे
जिल्हा प्रमुख संजय हाडे आणि तालुका प्रमुख संजय मोटे यांनी शासनाकडे
वेळोवेळी पाठपुरावा करून परवाने देण्याची मागणी केली. ४ जुलै २०१७ रोजी
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची माजी आमदार विजयराज शिंदे व शिव वाहतुक
सेनेचे संजय हाडे यांनी मुंबई मंत्रालय येथे भेट घेऊन तीन व चार चाकी
आॅटोरिक्षा व टॅक्सी चालकाच्या समस्येवर एक निवेदन देऊन त्यांना तात्काळ
परवाने देण्याबाबत कार्यवाही करण्याची मागणी केली. त्या अनुषंगाने शासन
निर्णय १८ जुलै २०१७ रोजी शासन निर्णय काढण्यात आला आहे. सदर निर्णयात
परवाने देण्याबाबत काही किरकोळ अटी व शर्तीच्या अधीन राहून नमूद
केल्यामुळे राज्यभरातील तीन व चार चाकी आॅटोरिक्षा व टॅक्सी चालकांना
मोठा दिलासा मिळाला आहे.