पंखा अंगावर पडल्याने रुग्ण जखमी

By Admin | Updated: May 3, 2017 00:34 IST2017-05-03T00:34:06+5:302017-05-03T00:34:06+5:30

मलकापूर: स्थानीय उपजिल्हा रुग्णालयात चक्क चिमुकल्या रुग्णाच्या अंगावर चालता पंखा पडल्याने महाराष्ट्र दिनी १ मे रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडल्याने एकच खळबळ उडाली.

Patients injured on the fan | पंखा अंगावर पडल्याने रुग्ण जखमी

पंखा अंगावर पडल्याने रुग्ण जखमी

मलकापूर: स्थानीय उपजिल्हा रुग्णालयात चक्क चिमुकल्या रुग्णाच्या अंगावर चालता पंखा पडल्याने महाराष्ट्र दिनी १ मे रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडल्याने एकच खळबळ उडाली. यात नगराध्यक्ष अ‍ॅड. हरीश रावळ यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले.
मलकापूर उपजिल्हा रुग्णालयातील जनरल वार्डमध्ये मधुकर निनाजी गणगे, नेहा सुकदेव म्हासकर, स्वाती नितेश खराडे, अलका शंकर केणे आदी उपचारासाठी दाखल आहेत. १ मे रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास सुरू असलेला पंखा अचानक खाली पडला. यामुळे नेहा सुकदेव म्हासकर (वय ७) रा. काटी ही हाताला मार लागल्याने जखमी झाली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. घटनेची वार्ता कळताच नगराध्यक्ष अ‍ॅड. हरीश रावळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींची व इतर रुग्णांची विचारपूस करून रुग्णालयात उपस्थित प्रशासनाच्या प्रतिनिधींना चांगलेच धारेवर धरले. उपजिल्हा रुग्णालयातील नादुरुस्त झालेले पंखे, लाइट, दरवाजे, खिडक्या तत्काळ बदली करा, त्याचबरोबर रुग्णालयात मूत्रीघर व शौचालयात स्वच्छता कायमस्वरूपी ठेवा, अशा आशयाची मागणी नगराध्यक्ष अ‍ॅड. रावळ यांनी उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे लेखी स्वरूपात केली. त्याचबरोबर सुधारणा न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा रावळ यांनी दिल्याने उपजिल्हा रुग्णालय प्रशासनात खळबळ माजली आहे.

Web Title: Patients injured on the fan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.