सुंदरखेड येथे आढळला रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:35 IST2021-07-28T04:35:48+5:302021-07-28T04:35:48+5:30

एस. टी.च्या आरक्षणासाठी स्वाईप सुविधा बुलडाणा : एस.टी. महामंडळाद्वारे प्रवाशांच्या सेवेसाठी विविध सेवा उपक्रम राबविण्यात येत असतात. प्रवाशांचा प्रवास ...

Patient found at Sundarkhed | सुंदरखेड येथे आढळला रुग्ण

सुंदरखेड येथे आढळला रुग्ण

एस. टी.च्या आरक्षणासाठी स्वाईप सुविधा

बुलडाणा : एस.टी. महामंडळाद्वारे प्रवाशांच्या सेवेसाठी विविध सेवा उपक्रम राबविण्यात येत असतात. प्रवाशांचा प्रवास सुखकर व सोपा होण्यासाठी एस.टी. महामंडळाकडून स्वाईप मशीनद्वारे पासेसची व आरक्षण काढताना आर्थिक व्यवहारासाठी स्वाईप मशीन सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

ओबीसी आरक्षण जैसे थे ठेवण्याची मागणी

बुलडाणा : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नोकरीतील ओबीसींचे आरक्षण आणि पदोन्नतीतील आरक्षण जैसे थे ठेवण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या वतीने करण्यात आली आहे. त्यासाठी काही ठिकाणी आंदोलनही करण्यात आले आहे.

खरिपाची पिके जाेमात

किनगाव राजा : गत आठवड्यात सिंदखेड राजा तालुक्यात सर्वत्र समाधानकारकरीत्या पाऊस बरसला असल्याने सध्या खरिपाची पिके जोमात आहेत. या पिकांत शेतकरी आता कोळपे मारून व निंदण करून तण काढत आहेत. सोबतच पिकांवरील कीड व विविध रोगांचा अटकाव करण्यासाठी औषध फवारणी चालविली आहे.

Web Title: Patient found at Sundarkhed