पातुर्डात वान नदीपात्राचे सर्वेक्षण

By Admin | Updated: August 3, 2015 01:23 IST2015-08-03T01:23:54+5:302015-08-03T01:23:54+5:30

लघुपाटबंधारे विभागाच्या अधिका-यांनी केले वान नदीपात्राचे सर्वेक्षण.

Patdar Van River Basin Survey | पातुर्डात वान नदीपात्राचे सर्वेक्षण

पातुर्डात वान नदीपात्राचे सर्वेक्षण

पातुर्डा (जि. बुलडाणा): परिसरातील वान नदीपात्रात बंधारे बांधणे या नागरिकांच्या मागणीनुसार लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी १ ऑगस्ट रोजी सकाळी १0 वाजता वान नदीपात्राचे सर्वेक्षण केले.
वान प्रकल्पाच्या निम्न भागात नदीचे पाणी बंद झाल्याने अनेक समस्या उभ्या राहिल्या. नदीपात्रात बंधारे बांधणे व नदी काठावरील परंपरागत जलस्त्रोत पुनजिर्वीत करणे व परंपरागत व्यवसायांना चालना देणे यासाठी शासनाने सर्वेक्षण करावे, अशी या भागातील मागणी आहे. यावेळी नागरिकांनी गायत्री नगर जवळ रस्ता वजा बंधारा, पातुर्डा-कोद्री पुलाला पुल वजा (ब्रिजकम) बंधारा, ढंगारीजवळ, पातुर्डा खुर्द देवीजवळ, कोद्री रस्त्यावरील मोरवा, चोरवा नाला असे स्थळ दाखविले. लघुपाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी मुदगूलकर, लांडे व सहकारी यांनी हे सर्वेक्षण पा तुर्डा परिसरात केले. यावेळी विश्‍वनाथ झाडोकार, ज्ञानेश्‍वर तायडे, मकसुद अली, कृष्णराव राहाटे, प्रकाश देशमुख, गोपाल उमाळे आदी उपस्थित होते.

Web Title: Patdar Van River Basin Survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.