प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्यास अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:31 IST2021-02-05T08:31:23+5:302021-02-05T08:31:23+5:30

जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी जिल्ह्यातील उघडकीस न आलेले मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस ...

Passenger's mobile thief arrested, action taken by local crime branch | प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्यास अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्यास अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी जिल्ह्यातील उघडकीस न आलेले मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा बुलडाणाच्या एका पथकाने ३० जानेवारी रोजी गोपनीय माहितीच्या आधारावर शेख मोहसीन शेख हसन (१९, रा. गौरक्षणवाडी) यास बसस्थानक परिसरात संशयास्पद स्थितीत फिरताना ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता १० हजार रुपये किमतीचा मोबाईल त्याच्याकडे मिळाला. बसस्थानक परिसरातूनच त्याने एका वृद्धाची नजर चुकवून तो चोरल्याची कबुली दिली. आरोपी शेख मोहसीन विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास चिखली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिदंमवार, नीलेश शेळके, पोलीस अंमलदार विजय सोनोने, संजय नागवे, वैभव मगर यांनी ही कारवाई केली आहे.

फोटो कॅप्शन : अटक केलेल्या आरोपीसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील कर्मचारी.

Web Title: Passenger's mobile thief arrested, action taken by local crime branch