पालकांचे छत्र हरविलेल्या निराधार मुलांना मदत!
By Admin | Updated: March 4, 2016 02:26 IST2016-03-04T02:26:27+5:302016-03-04T02:26:27+5:30
अंढेरा येथे जीवनसाथी फाऊंडेशनचा सामाजिक उपक्रम.

पालकांचे छत्र हरविलेल्या निराधार मुलांना मदत!
शिवणी आरमाळ (जि. बुलडाणा): देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा येथील आई वडिलांचे छत्र हरविलेल्या गणेश व मंदाकिनी या भावंडांना जीवनसाथी फाऊंडेशन देऊळगाव महीच्या वतीने २९ फेब्रुवारी रोजी आर्थिक मदत देण्यात आली.
वडील सुखदेव वैद्य, आई लिलाबाई वैद्य या दोघांचे दुर्धर आजाराने निधन झाल्याने गणेश व मंदाकिनी हे पोरके झाले. जीवन जगत असताना अनेक समस्यांसह आर्थिक बाजूंची चणचण भासत असताना आजीसह बहीण-भाऊ त्रस्त झाले होते आणि अवघ्या काही दिवसांवर बहीण मंदाकिनी हिचा विवाह कार्यक्रम येऊन ठेपल्यामुळे या बहीण-भावावर मोठे संकट उभे होते. या सर्व परिस्थितीची माहिती मिळताच देऊळगाव मही येथील जीवनसाथी फाऊंडेशन यांनी तत्काळ दखल घेऊन त्या कुटुंबासाठी खारीचा वाटा उचलून मदत केली आहे. यावेळी जीवनसाथी फाऊंडेशनचे सर्व सदस्यांनी निर्णय घेऊन आर्थिक मदत करण्याचे ठरविले व त्यांच्या घरी जाऊन त्यांना १५ हजार रुपये रोख रक्कम दिली. त्याचबरोबर दे. राजाचे तालुका पुरवठा अधिकारी संजय टाके यांनी आर्थिक मदत व रेशनकार्ड उपलब्ध करून दिले व देऊळगावमही अर्बनच्या वतीने आर्थिक मदत दिली. तसेच रा.स.प. ता. अध्यक्ष भगवान बोंबले यांनीसुद्धा आर्थिक मदत दिली.