पत्रकारसंघाच्या अध्यक्षपदी पप्पू राठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:28 IST2021-01-04T04:28:42+5:302021-01-04T04:28:42+5:30
मोताळा तालुका पत्रकार संघाची बैठक रविवारी मोताळा येथे पार पडली. दरम्यान, तालुका पत्रकारसंघाच्या कार्यकारिणीचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने ...

पत्रकारसंघाच्या अध्यक्षपदी पप्पू राठी
मोताळा तालुका पत्रकार संघाची बैठक रविवारी मोताळा येथे पार पडली. दरम्यान, तालुका पत्रकारसंघाच्या कार्यकारिणीचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने सदर कार्यकारिणी बरखास्त करून जिल्हा उपाध्यक्ष विश्वासराव पाटील, माजी तालुकाध्यक्ष शाहीद कुरेशी, पी. एम. सरकाटे, प्रा. गणेश झंवर यांच्या मार्गदर्शनात नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. अध्यक्षपदी पप्पू राठी, उपाध्यक्ष श्रीधर राजनकर (रोहिणखेड) आणि वसंत जगताप (धामणगाव बढे), सचिव कृष्णा पाटील, सहसचिव नारायण बोरसे (धामणगाव बढे), संघटक ज्ञानेश्वर जवरे, कोषाध्यक्ष हमीद कुरेशी, प्रसिद्धी प्रमुख वकार अहेमद, तर कार्यकारिणी सदस्य म्हणून माजी तालुकाध्यक्ष शाहीद कुरेशी, पी. एम. सरकटे, प्रा. गणेश झंवर, किशोर खंदारे, शंकर तेलंग, अकिल कुरेशी, नवीन मोदे, संतोष बगळे, ईश्वर परदेशी, तानाजी ठोंबरे यांचा समावेश आहे. दरम्यान, पत्रकारसंघाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.