वडी येथील पाइप फॅक्टरीत बिबट्या दिसल्याने दहशत
By Admin | Updated: May 9, 2016 02:08 IST2016-05-09T02:08:22+5:302016-05-09T02:08:22+5:30
वनविभागाची दोन पथके घटनास्थळी दाखल;बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरु.

वडी येथील पाइप फॅक्टरीत बिबट्या दिसल्याने दहशत
नादुंरा (जि. बुलडाणा): राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाला लागूनच असलेल्या तालुक्यातील वडी शिवारातील पाइप फॅक्टरीत रात्री दहा वाजेदरम्यान बिबट्या दिसुन आल्याने सर्वत्र दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री अकरा वाजेदरम्यान वनविभागाचे पथक दाखल झाले. वडी शिवारातील पाईप फॅक्टरीत साठविण्यात आलेल्या पाईपमध्ये मागील दोन दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याची माहिती मजूरांनी दिली होती. रविवारी रात्री पुन्हा एकदा बिबट्या आढळला. तेथील व्यवस्थापकाने नगरसेवक अनिल सपकाळ यांना माहिती दिली. सपकाळ यांनी तातडीने वनविभागाला यासंदर्भात कळविल्यानंतर रात्री ११ वाजेच्या सुमारास वनविभागाची दोन पथके घटनास्थळी दाखल झाली असून बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरु होते.