पंचायतराज समिती १८ जानेवारीला जिल्ह्यात
By Admin | Updated: January 7, 2016 02:20 IST2016-01-07T02:20:57+5:302016-01-07T02:20:57+5:30
सुधारित दौरा जाहीर ; बुलडाणा जिल्हा प्रशासन तत्पर.

पंचायतराज समिती १८ जानेवारीला जिल्ह्यात
बुलडाणा : पंचायतराज समितीचा ११ जानेवारीपासून होणारा दौरा पुढे ढकलल्यामुळे ही समि ती कधी येणार, याबाबत प्रशासकीय वतरुळात उत्सुकता होती. दरम्यान, या समितीचा सुधारित दौरा बुधवारी जिल्हा परिषदेत धडकल्यामुळे प्रशासन पुन्हा एकदा तत्पर झाले आहे. ही समि ती १८ जानेवारीपासून तीन दिवस जिल्ह्यात दाखल होत आहे. गेल्या दोन वषार्ंपासून पंचायतराज समितीचा दौरा प्रत्येकवेळी पुढे ढकलला गेला आहे. यावर्षी ही समिती ११ ते १३ जानेवारी दरम्यान जिल्ह्यात येणार होती, त्यासाठी प्रशासनाने सर्व अहवाल तयार केले; मात्र या दौरा कालावधीत राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांचा जयंती उ त्सव येत असल्याने मराठा सेवा संघाच्यावतीने हा दौरा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. समितीचे सदस्य आ.भाऊसाहेब फुंडकर यांनी ही मागणी मान्य करत दौरा पुढे ढकलण्याची विनंती समितीच्या अध्यक्षांना केली होती. त्यानुसार या समितीचा नियोजित दौरा आता १८ जानेवारीपासून होत आहे. १८ जानेवारीला विधिमंडळ सदस्यांशी व जिल्हा परिषद पदाधिकार्यांशी अनौपचारिक चर्चा केल्यानंतर सकाळी ११ वाजता जि.प.च्या सभागृहात सन २00८-0९ व २0११-१२ या लेखा वर्षातील लेखापरीक्षा पुनर्विलोकन अहवालाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांची साक्ष होणार आहे, तर मंगळवार, १९ जानेवारी रोजी जिल्ह्यातील विविध पंचायत समिती अं तर्गत शासकीय कार्यालयांना भेट दिली जाणार आहे. २0 जानेवारी रोजी सन २0१२-१३ या वर्षातील वार्षिक प्रशासन अहवालासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांची साक्ष होणार आहे.