शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत समिती अधिकाऱ्यांच्या वेतनावर गदा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 18:12 IST

- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा : ग्रामपंचायत कर्मचाºयांचे वेतन आॅनलाइन करण्यासाठी राज्यातील ४० हजार ९९५ कर्मचाºयांची माहिती किमान वेतन प्रणालीमध्ये भरण्यात आलेली आहे; परंतु आतापर्यंत केवळ १ हजार ४०० कर्मचाºयांचेच वेतन आॅनलाइन प्रणालीद्वारे करण्यात येत आहे. त्यामुळे जोपर्यंत १०० टक्के ग्रामपंचायत कर्मचाºयांची माहिती किमान वेतन प्रणालीमध्ये भरली जात नाही, तोपर्यंत उपमुख्य कार्यकारी ...

- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा : ग्रामपंचायत कर्मचाºयांचे वेतन आॅनलाइन करण्यासाठी राज्यातील ४० हजार ९९५ कर्मचाºयांची माहिती किमान वेतन प्रणालीमध्ये भरण्यात आलेली आहे; परंतु आतापर्यंत केवळ १ हजार ४०० कर्मचाºयांचेच वेतन आॅनलाइन प्रणालीद्वारे करण्यात येत आहे. त्यामुळे जोपर्यंत १०० टक्के ग्रामपंचायत कर्मचाºयांची माहिती किमान वेतन प्रणालीमध्ये भरली जात नाही, तोपर्यंत उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व ग्रामसेवक या पंचायत समितीच्या अधिकाºयांच्या मासिक वेतनावर गदा येणार आहे.राज्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाºयांचे वेतन आॅनलाइन पद्धतीने थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची योजना ग्रामविकास विभाग व एचडीएफसी बँक यांच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत ग्रामपंचायत कर्मचाºयांची माहिती किमान वेतन प्रणालीवर भरणे आवश्यक आहे. ग्रामसेवकामार्फत ग्रामपंचायत कर्मचाºयांची सर्वंकष माहिती आॅनलाइन वेतन प्रणालीवर भरण्यात येते, त्यानंतर संबंधित गटविकास अधिकारी ती महिती पुढे प्रमाणित करतात. त्यानुसार कर्मचाºयांच्या मासिक वेतनाची माहिती राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान पुणेचे प्रकल्प संचालक यांच्या ‘लॉग-इन’मध्ये प्राप्त होते. आजपर्यंत ग्रामपंचायत स्तरावर ४० हजार ९९५ कर्मचाºयांची माहिती वेतन प्रणालीमध्ये भरण्यात आलेली आहे. त्यानंतर गटविकास अधिकाºयांनी ही माहिती प्रमाणित करून राज्यातील केवळ १ हजार ४०० कर्मचाºयांचेच वेतन आॅनलाइन प्रणालीद्वारे करण्यात येत आहे. सर्व कर्मचाºयांची माहिती वेतन प्रणालीवर भरण्यास वारंवार सूचना देऊनही टाळाटाळ केली जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कर्मचाºयांच्या बँक खात्यावर थेट वेतन जमा करण्याच्या पद्धतीला विलंब लागत आहे. या प्रकाराकडे ग्राम सचिवांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे. १०० टक्के ग्रामपंचायत कर्मचाºयांची माहिती आॅनलाइन प्रणालीमध्ये भरली जात नाही, तोपर्यंत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व ग्रामसेवक यांचे मासिक वेतन अदा न करण्याच्या सूचना ग्रामविकास विभागाच्या उपसचिवांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांना १८ आॅगस्ट रोजी दिल्या आहेत.ग्रामपंचायत कर्मचाºयांची माहिती किमान वेतन प्रणालीमध्ये भरण्याच्या सूचना ग्रामविकास विभागाकडून आल्या आहेत. यासंदर्भात पत्र प्राप्त झाले असून, कर्मचाºयांची माहिती आॅनलाइन टाकण्याचे काम जवळपास पूर्ण होत आलेले आहे.- संजय चोपडे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत)जिल्हा परिषद, बुलडाणा.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाpanchayat samitiपंचायत समिती