पलसिद्ध महास्वामींचा गजर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 01:05 IST2017-08-12T01:03:27+5:302017-08-12T01:05:30+5:30

साखरखेर्डा : तीर्थक्षेत्र साखरखेर्डा येथील श्री जगद्गुरू पलसिद्ध महास्वामी यांच्या स्मृती महोत्सवाला १0 ऑगस्टपासून प्रारंभ झाला असून, शेकडो दिंड्यांच्या सहभागातून दिंडी सोहळा पार पडला. यावेळी साखरखेर्डा येथे हजारो भाविकांची मांदियाळी जमली होती.

Palsid Mahaswamikar alarm! | पलसिद्ध महास्वामींचा गजर!

पलसिद्ध महास्वामींचा गजर!

ठळक मुद्देहजारो भाविकांची मांदियाळी साखरखेर्डा नगरी दुमदुमली!

लोकमत न्यूज नेटवर्क
साखरखेर्डा : तीर्थक्षेत्र साखरखेर्डा येथील श्री जगद्गुरू पलसिद्ध महास्वामी यांच्या स्मृती महोत्सवाला १0 ऑगस्टपासून प्रारंभ झाला असून, शेकडो दिंड्यांच्या सहभागातून दिंडी सोहळा पार पडला. यावेळी साखरखेर्डा येथे हजारो भाविकांची मांदियाळी जमली होती.
श्री जगद्गुरू पलसिद्ध महास्वामी यांच्या स्मृती महोत्सवानिमित्त सकाळी ६ वाजता नामस्मरणला प्रारंभ झाला. त्यानंतर सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांच्या उपस्थितीत शिवदीक्षा संस्कार विधीला प्रारंभ झाला. वेदमूर्ती नीळकंठ स्वामी यांनी संस्कार विधीचे नेतृत्व केले. स्मृती महोत्सव सोहळ्यात परळी वैजीनाथ, धामणगाव बढे, लोहगड, नांद्रा, आष्टी, चारठाणा, काटा, परभणी, गंगाखेड, माजलगाव, पानकन्हेरगाव, साडेगाव, वस्सा, इटोली, हिवरखेड, लोणगाव, घाटबोरी इत्यादी दिंड्या सहभागी झाल्या होत्या. त्या सर्व दिंड्यांचे स्वागत मठाधिपती सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांनी केले. त्यानंतर दुपारी ४ वाजता पलसिद्ध महास्वामींची पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. पालखीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. 
रांगोळ्यांनी पालखी रस्ता सजला होता. पालखीचे पूजन आणि दर्शनासाठी रीघ लागली होती. पावली, लेजीम खेळत आणि पलसिद्धाचा गजर करीत  ७ वाजता पालखी सोहळ्याची सांगता झाली.  

Web Title: Palsid Mahaswamikar alarm!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.