खामगावातील पळशी गावाने मिळविला होता राज्यातील पहिलाच पुरस्कार
By Admin | Updated: February 17, 2015 01:27 IST2015-02-17T01:27:15+5:302015-02-17T01:27:15+5:30
स्मृती उजाळा; आबांच्या संकल्पनेतील ग्रामस्वच्छतेला बुलडाणा जिल्ह्याची साथ.

खामगावातील पळशी गावाने मिळविला होता राज्यातील पहिलाच पुरस्कार
बुलडाणा : एक संवेदनशील व विधायक वृत्तीचा नेता म्हणून उभ्या महाराष्ट्रात आर.आर.पाटील यांची ओळख निर्माण करण्याचे काम त्यांनी सुरू केलेल्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाने केले. ग्रामविकाससारख्या उपेक्षित खात्याला नवे रूप देतानाच गावोगाव स्वच्छतेचा मंत्र पसरवून लोकचळवळ निर्माण करण्याचे काम त्यांनी केल्यामुळे त्यांचा आदराने ह्यमहाराष्ट्राचे आधुनिक गाडगेबाबाह्ण असा उल्लेख केला जायचा. या चळवळीला बुलडाणा जिल्ह्याने भरभरून साथ दिली. सन २000-२00१ या वर्षात या योजनेतील राज्यातील पहिलाच पुरस्कार खामगावातील पळशी गावाने पटकावून आबांच्या प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखीत केले होते. सोमवारी आर.आर.आबा यांचे निधन झाल्यानंतर ही बाब प्रकर्षाने समोर आली आहे. ग्रामस्वच्छता अभियान या योजनेने महाराष्ट्रात नव्या लोकचळवळीचे बीजारोपण केले. गावोगाव स्वच्छतेचा जागर सुरू झाला. याचे सारे ङ्म्रेय आर.आर.आबा यांना जाते. पळशी हे गाव राज्यात चमकल्यावर दुसर्याच वर्षी वकाणा या गावाने राज्यात बाजी मारली. त्यानंतर सुरू झालेली ही स्वच्छतेची चळवळ आजतागायत सुरूच आहे. सामाजिक क्षेत्रात मोठी क्रांती घडविणार्या आर.आर.आबांचा बुलडाण्याशी अनेक अर्थांनी ऋणानुबंध राहिला आहे. माजी आरोग्य मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्यावर त्यांचे विशेष प्रेम होते. ह्यडॉक्टरह्ण या नावांनी अनेकदा जाहीर भाषणातूनही त्यांनी ते व्यक्त केले होते.