जुगार खेळणारा पाेलीस कर्मचारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:26 IST2021-06-01T04:26:07+5:302021-06-01T04:26:07+5:30

बुलडाणा : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लाेणार येथे सुरू असलेल्या जुगारावर धाड टाकून ३२ जणांवर कारवाई केली. या दरम्यान ...

Paelis staff suspended for gambling | जुगार खेळणारा पाेलीस कर्मचारी निलंबित

जुगार खेळणारा पाेलीस कर्मचारी निलंबित

बुलडाणा : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लाेणार येथे सुरू असलेल्या जुगारावर धाड टाकून ३२ जणांवर कारवाई केली. या दरम्यान तेथे एक पाेलीस कर्मचारीही आढळला हाेता. त्या कर्मचाऱ्यास पाेलीस अधीक्षकांनी निलंबित केले आहे. रविराज केशव चव्हाण असे निलंबित पाेलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे़

लाेणार येथे जुगार सुरू असल्याची माहिती पाेलीस अधीक्षक अरविंद चावरीया यांना मिळाली हाेती. या माहितीच्या आधारे त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले हाेते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २४ मे रोजी जुगारावर धाड टाकून ३२ जणांवर कारवाई केली हाेती. यात देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला रविराज केशव चव्हाण हासुद्धा आढळला हाेता. पाेलीस अधीक्षकांनी चव्हाण यास निलंबित केले आहे.

Web Title: Paelis staff suspended for gambling