मेहकर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आक्रोश आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:37 IST2021-03-09T04:37:06+5:302021-03-09T04:37:06+5:30

मेहकर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष देवानंद पवार आणि नगराध्यक्ष कासम गवळी यांच्या नेतृत्वाखाली हे आक्रोश आंदोलन करण्यात आले. या ...

Outrage agitation on behalf of Mehkar Taluka Congress Committee | मेहकर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आक्रोश आंदोलन

मेहकर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आक्रोश आंदोलन

मेहकर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष देवानंद पवार आणि नगराध्यक्ष कासम गवळी यांच्या नेतृत्वाखाली हे आक्रोश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास जानेफळ चौकातून सुरवात करण्यात आली होती. उपविभागीय अधिकारी कार्यालायात आंदोलनाचा समारोप करण्यात आला. केंद्र शासनाच्या गलथान कारभाराविरुद्ध घोषणाबाजी करून निवेदन देण्यात आले. या आंदोलनात सायकलचाही सहभाग होता. कोरोनामुळे जास्त कार्यकर्ते व पदाधिकारी न बोलविता मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हे आक्रोश आंदोलन करण्यात आले. पदाधिकाऱ्यांनी मास्क लावून सहभाग नोंदविला होता. या वेळेस या आंदोलनाला वसंतराव देशमुख, पंकज हजारी, गजेन्द्र माने, नीलेश मानवतकर, आलियार खान, नीलेश सोमण, संजय ढाकरके, मुजीब खान, उस्मान शहा, अनिल चांगाडे, स्मित सावजी, अजगर शेख, सलमान शेख, मनोज गोरे, प्रल्हाद आदींची उपस्थिती होती.

Web Title: Outrage agitation on behalf of Mehkar Taluka Congress Committee