शेतातून जाण्याच्या वादातून दोन गटात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 00:56 IST2017-07-21T00:56:43+5:302017-07-21T00:56:43+5:30

खामगाव : शेतातून जाण्याच्या वादातून कंझारा येथे दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारींवरून ग्रामीण पोलिसांनी दोन्ही गटामधील ११ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Outbreaks of two groups clash between the two fields | शेतातून जाण्याच्या वादातून दोन गटात हाणामारी

शेतातून जाण्याच्या वादातून दोन गटात हाणामारी

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : शेतातून जाण्याच्या वादातून कंझारा येथे दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारींवरून ग्रामीण पोलिसांनी दोन्ही गटामधील ११ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
आनंद विश्वनाथ खेडकर (वय २५) रा. गोंधनापूर यांना तसेच त्यांच्या आईला अजहर डॉक्टर, अजहर वकील, जाफर खान व इतर दोघांनी शेताच्या रस्त्यात अडवणूक करून शिवीगाळ केली व उजव्या हाताला आणि पायावर ब्लेडने मारून जखमी केले. या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त पाच जणांविरुद्ध कलम १४२, ३२४, ५०४, ३२२ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Outbreaks of two groups clash between the two fields