शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळीचा प्रकोप, शेतात चारली मेंढरे

By विवेक चांदुरकर | Updated: November 4, 2023 17:05 IST

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जोरदार धुके पडल्यामुळे कपाशी पीक खराब होऊन लाल्या रोगाचे आक्रमण झाले.

बोरखेड (बुलढाणा) : कपाशी पिकावर बोंडअळी व लाल्या रोगाने आक्रमण केल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. उत्पादनात घट येणार असल्याचे निदर्शनास आल्यावर बागायतदार शेतकऱ्यांनी उभ्या पिकात मेंढरे चारणे चालू केले आहे.

संग्रामपूर तालुक्यातील बोरखेड, सगोडा, दानापूर, सोनाळा शिवारात शेतकऱ्यांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात बागायती कपाशी पिकाची पेरणी केली, तसेच कपाशीचे पीक चांगले येईल या आशेने शेतकऱ्यांनी खते, फवारणीवर हजारो रूपयांचा खर्च केला. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जोरदार धुके पडल्यामुळे कपाशी पीक खराब होऊन लाल्या रोगाचे आक्रमण झाले. त्यामुळे कपाशी पिकाची पानगळ होऊन कमी वजनाचा कापूस शेतकऱ्यांना वेचावा लागत आहे, तसेच पंधरा दिवसांपासून शेतात कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसल्यामुळे शेतकऱ्यांनी कपाशी पिकात मेंढरे चरायला सोडली आहेत. एकरी चार ते पाच क्विंटल शेतकऱ्यांना कपाशीचे उत्पादन आल्यामुळे पिकाला लागलेला खर्चसुद्धा निघाला नाही. कपाशीचे पीक घरात येईपर्यंत एकरी २५ ते ३० हजारांपर्यंत खर्च येतो. लाल्या रोगामुळे नुकसान होत असल्याने अखेरीस मेंढरे चारायला सुरुवात केली आहे.

व्यापाऱ्यांकडून अडवणूक

कापूस ओलसर असल्याचे कारण देत साडेसहा हजारापर्यंत कापसाची खरेदी खाजगी व्यापाऱ्याकडून चालू आहे. नैसर्गिक संकटामुळे शेतकरी हतबल झाला आहे. शेतकऱ्यांनी उसनवारी, पैसे आणून कपाशीचे पीक उभे केले, अशा नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांनी मुला-मुलींचे शिक्षण, लग्न, घरातील वृद्धांच्या आजारपण कसे काय करावे, या विवंचनेत कापूस उत्पादक शेतकरी अडकला आहे.दोन एकर शेतात कपाशीला पन्नास हजार रुपये खर्च आला. दोन एकरांत नऊ क्विंटल कापूस निघाला. शेतात पूर्णपणे बोंडअळी आल्यामुळे दुसरे पीक घेण्याकरिता शेतात मेंढरे चारण्याचा निर्णय घेतला.- उमेश भटकरशेतकरी, सगोडा

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरी