अन्यथा बीसएनएलची बोलती बंद होणार..!

By Admin | Updated: March 19, 2017 13:37 IST2017-03-19T13:37:51+5:302017-03-19T13:37:51+5:30

दंड न भरल्यास बीएसएनएलच्या कार्यालयासह तालुक्यातील ९ टावर ला सील ठोकण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार यांनी दिली आहे.

Otherwise BSNL's speech will stop ..! | अन्यथा बीसएनएलची बोलती बंद होणार..!

अन्यथा बीसएनएलची बोलती बंद होणार..!

आठरा वर्षापासून अकृषक थकबाकी; दंड भरण्यासाठी सोमवारचा अल्टीमेटम्
मोताळ : मोताळा तालुक्यात बीएसएनएल कंपनीचे ९ टावर कार्यान्वीत असून,
मागील १८ वर्षापासून १ लाख ६३ हजार ४२५ रूपयांची अकृषक वसुली बाकी आहे.
त्यामुळे मोताळा तहसीलदार यांनी दंड भरण्याबाबत संबंधितांना नोटीस देऊन
सोमवार २० मार्च रोजीचा अल्टीमेटम् दिला आहे. दंड न भरल्यास बीएसएनएलच्या
कार्यालयासह तालुक्यातील ९ टावर ला सील ठोकण्यात येणार असल्याची माहिती
तहसीलदार यांनी दिली आहे.
       तालुक्यात भारत संचार निगमचे पिंप्रीगवळी, शेलगाव बाजार, पोफळी,
काजनपूर, बोराखेडी, धामणगाव बढे, तळणी, कोऱ्हाळा बाजार व तरोडा अश्या ९
ठिकाणी टावर कार्यान्वीत आहेत. या ९ टावरपैकी काही १६, १२, ८, ७, ६
वर्षापासून अस्तिवात आहेत. महसूल प्रशासनाकडून वेळोवेळी थकबाकीबाबत
वर्षनिहाय दंडाची अकृषक आकारणी केल्या गेली. मात्र संबंधित विभागाने सदर
दंडाची रक्कम भरली नाही. सन २०१५-१६ व २०१६-२०१७ या वर्षाकरीता
पिंप्रीगवळी ३२० रूपये, शेलगाव बाजार २४०, पोफळी १६०, काजनपूर १६०,
बोराखेडी ४४४०, धा. बढे ५६०, तळणी ४८०, कोऱ्हाळा बाजार ४८०० व तरोडा येथील
टावरला ५६० रूपये अकृषक आकारणी करण्यात आली. सदर थकबाकी न भरल्यामुळे
आकारणीचे सात पट नंतर वाढीव सारा अकृषक आकारणी, रूपांतरीत कर
(आकारणीच्या तीन पट) नंतर अकृषक आकारणीच्या ४० पट दंड अशी एकूण थकबाकीची
रक्कम रोजी पिंप्रीगवळी टावर ४०६० रूपये, शेलगाव बाजार ३०४५, पोफळी २०३०,
काजनपूर २४६०, बोराखेडी ६०३१०, धामणगाव बढे ९०४०, तळणी ८२४०, कोऱ्हाळा
बाजार ६५२०० व तरोडा टावरकडे ९०४० असे एकूण १ लाख ६३ हजार ४२५ अकृषक
वसुली बाकी आहे. तहसीलदार मोताळा यांनी सदर दंडाची रक्कम भरण्यासाठी
संबंधित विभागाला नोटीस दिली असून सोमवारचा अल्टीमेटम् दिला आहे.
संबंधितांनी सोमवारी दंडाची रक्कम न भरल्यास येथील भारत संचान निगमचे
कार्यालय व तालुक्यातील ९ टावरला सील करण्यात येणार असल्याची माहिती
तहसीलदार  रूपेश खंदारे यांनी दिली.

Web Title: Otherwise BSNL's speech will stop ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.