सेंद्रिय भाजीपाला उपयुक्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:46 IST2017-08-19T00:46:30+5:302017-08-19T00:46:50+5:30
बुलडाणा : शेतकर्यांचा शेतीमालाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडी बाजार उपक्रम राबविण्यात येत आहे. या बाजाराच्या माध्यमातून सेंद्रिय भाजीपाला ग्राहकांना मिळणार आहे. तरी नागरिकांनी या आठवडी बाजाराचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले.

सेंद्रिय भाजीपाला उपयुक्त!
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : शेतकर्यांचा शेतीमालाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडी बाजार उपक्रम राबविण्यात येत आहे. या बाजाराच्या माध्यमातून सेंद्रिय भाजीपाला ग्राहकांना मिळणार आहे. तरी नागरिकांनी या आठवडी बाजाराचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले.
जयस्तंभ चौकस्थित नगरपालिकेच्या शाळा क्रमांक दोनच्या आवारात शेतकरी आठवडी बाजाराचा उद्घाटनीय कार्यक्रम मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष उमा तायडे, जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जि.प. सभापती श्वेता महाले, माजी आमदार धृपदराव सावळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जालींदर बुधवत, योगेंद्र गोडे, मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण, आत्माचे प्रकल्प संचालक नरेंद्र नाईक आदी उपस्थित होते.
कृषी पणन कायद्यात दुरुस्ती करून शेतकरी आठवडी बाजारांना अधिकृत दर्जा मिळाला असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, या शेतकरी आठवडी बाजारांमध्ये दलालांची साखळी नसणार आहे. त्यामुळे याचा लाभ थेट शेतकर्यांना मिळणार आहे. शेतकरी कृषी उत्पादक कंपन्यांचे बियाणे महामंडळाने खरेदी करण्यासाठी व बियाणे विक्रीस परवानगी देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. शेतकरी कृषी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून सेंद्रिय शेतमाल उत्पादन, विपणनाचे मोठे काम जिल्ह्यात उभे राहिले आहे. या कंपन्यांच्या पाठीशी राज्याचा कृषी विभाग उभा आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेतकरी उत्पादक कंपनी फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश सुरडकर यांनी केले. आठवडी बाजाराचे फीत कापून सर्वप्रथम उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर पालकमंत्री यांनी शेतकरी उत्पादक कंपनीच्यावतीने उभारण्यात आलेल्या भाजीपाला स्टॉलला भेट दिली. यावेळी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी भाजीपालासुद्धा खरेदी केला. तसेच शेतकर्यांची विचारपूस करून माहिती घेतली. सदर बाजार दर बुधवारी दुपारी ४ ते सायंकाळी ७ वाजेदरम्यान भरविल्या जाणार आहे. तरी नागरिकांनी बाजाराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे संचालन गोपाळ जाधव यांनी तर आभार अजय देशमुख यांनी मानले. याप्रसंगी बुलडाणा जिल्हा शेतकरी उत्पादक कंपनीचे पदाधिकारी, नगरपालिकेचे पदाधिकारी, शेतकरी बंधू, कंपन्यांचे संचालक आदींची मोठय़ा संख्येने उपस्थिती होती.