अतिक्रमण हटविण्याचे आदेश

By Admin | Updated: April 2, 2015 01:54 IST2015-04-02T01:54:56+5:302015-04-02T01:54:56+5:30

बुलडाणा जि. प्र. सीईओची दखल; शाळा पुन्हा सुरू होणार.

Order for deletion of encroachment | अतिक्रमण हटविण्याचे आदेश

अतिक्रमण हटविण्याचे आदेश

मोताळा (जि. बुलडाणा): तालुक्यातील जयपूर येथील उर्दू शाळा परिसरातील अतिक्रमणप्रकरणी स्थानिक प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करावी, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी १ एप्रिल रोजी दिले आहे, त्यामुळे गेल्या १४ दिवसांपासून चिघळत चाललेले शाळा बंद आंदोलन मिटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे लोकमत ३१ मार्च रोजी शाळा बंद आंदोलनाकडे लक्ष वेधले होते. जयपूर येथील जि. प. च्या उर्दू शाळा परिसरात काही नागरिकांनी अतिक्रमण केले असून, हे अवैध अतिक्रमण हटविण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने पाठ पुरावा करूनही प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने पालकांनी पाल्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेऊन ३१ मार्चपर्यंत कायम ठेवला, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. आज शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांनी याप्रकरणी सखोल चौकशी केली; तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ यांनी शिक्षण विभागाला व गटविकास अधिकार्‍याला याप्रकरणी त्वरित व उचित कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: Order for deletion of encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.