शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
6
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
7
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
8
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
9
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
10
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
11
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
12
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
13
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
14
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
15
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
16
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
17
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
18
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
19
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
20
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट

लोणार तालुक्यात नविन चेहऱ्यांना सधी; पिंपळखुटा सरपंचपदी मापारी तर किन्हीच्या सरपंचपदी कायंदे विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 15:39 IST

यंदा सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार असल्याने मोठ्या प्रमाणात उत्सुकता होती...

मयूर गोलेच्छा -लोणार (बुलढाणा)  : तालुक्यातील पिंपळखुटा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रामदास मापारी, तर किन्ही ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवप्रसाद कायंदे विजयी झाले आहेत. किन्ही-पिंपळखुटा-मातमळ गट ग्रामपंचायतींपैकी नव्याने निर्माण झालेल्या किन्ही आणि पिंपळखुटा - मातमळ ग्रामपंचायतीसाठी १८ सप्टेंबर रोजी मतदान घेण्यात आले. यंदा सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार असल्याने मोठ्या प्रमाणात उत्सुकता होती. सोमवारी तहसील कार्यालयात मतमोजणी करण्यात आली. यामध्ये किन्ही ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवप्रसाद काशीराम कायंदे हे विजयी झाले. कायंदे यांनी ४५३ एवढी मते घेऊन विकास मदनराव इंगोले यांचा १३७ मतांनी पराभव केला, तसेच प्रभाग एकमधून महादेव आनंदा मोरे, शांताबाई वसंता चव्हाण, मंगल अमोल शिंदे, प्रभाग २ मधून कविता विकास इंगोले, अमोल पंजाबराव चव्हाण, प्रभाग ३ मधून कृषिवार्ता श्रावण म्हस्के, पुरुषोत्तम महादू चव्हाण हे सदस्य अविरोध निवडून आले आहे. गट ग्रामपंचायत मधून किन्ही ग्रामपंचायत स्वतंत्र अस्तित्वात आल्या नंतर सरपंच पदासाठी जनतेतून पहिल्यांदाच पार पडलेल्या या निवडणुकीत किन्ही येथील ७ मतदारांनी नोटाला मतदान केले आहे.

पिंपळखुटा - मातमळ गट ग्राम पंचायतच्या सरपंच पदासह ७ सदस्यांसाठी निवडणुक घेण्यात आली़  सरपंच पदासाठी प्रगतीशील शेतकरी रामदास तुकाराम मापारी यांनी ९३० मते घेऊन दणदणीत विजय मिळवला. त्यांनी या निवडणुकीत ५७१ मतांची आघाडी घेत आपल्या विरोधकांना पराभूत केले. तसेच प्रभाग १ मधून नामाप्र महिला जागेवर पुष्पा खुशालराव गायकवाड यांनी २२० मते, अमोल दिनकर शिंदे २४५ मते, नंदा गजानन खोडकर २३६ मते, प्रभाग दोन मधून शोभा सोनाजी चव्हाण २९६ मते, पूजा कैलास मापारी ३८० मते, तर प्रभाग तीन मधून सतीश केरुबा मापारी यांनी सर्वाधिक ४४३ मते, घेऊन दणदणीत विजय मिळवला. पिंपळखुटा ग्रामपंचायत मध्ये तीन जागेवर प्रभाग २ मधून आसाराम विश्वनाथ मापारी, तर प्रभाग तीन मधून राजेश भीमराव मापारी, व शारदा माधव काळे हे तीन सदस्य अविरोध निवडून आले आहे. 

टॅग्स :sarpanchसरपंचElectionनिवडणूकbuldhanaबुलडाणा