'त्या’ रोहयो मजुरांचे पोस्टात खाते उघडणार
By Admin | Updated: January 28, 2015 23:37 IST2015-01-28T23:37:40+5:302015-01-28T23:37:40+5:30
लोकमत वृत्ताचा प्रभाव; डाकपालाने दिले खाते उघडण्याचे निर्देश.
_ns.jpg)
'त्या’ रोहयो मजुरांचे पोस्टात खाते उघडणार
बुलडाणा : मोताळा तालुक्यातील डिडोळा ग्रामपंचायत अंतर्गत नोंदणी झालेल्या रोजगार हमी योजनेच्या मजुरांचे खाते टपाल कार्यालयात उघडण्यास मलकापूर उपडाकघराने नकार दिला होता. यासंदर्भात ह्यलोकमतह्ण ने २८ जानेवारीच्या अंकात वृत्त प्रकाशित करताच मलकापूर उपडाकघराने सारवासारव करीत सदर खाती उघडण्यास सुरुवात केली.
रोजगार हमी योजनेच्या मजुरांना टपाल कार्यालयामार्फत मजुरी दिली जाते. त्यामुळे प्रत्येक जॉब कार्डधारक मजुराला डाकघरात खाते उघडणे बंधनकारक आहे; मात्र मलकापूर येथील उपडाकघरात डिडोळा येथील ४00 मजुरांचे खाते उघडण्यास संबंधित विभागाने असर्मथता दर्शविली. हे वृत्त प्रकाशित होताच बुधवारी जिल्हा डाकपाल यांनी मलकापूर उपडाकघराकडे विचारणा केली तसेच खाते उघडण्याचे निर्देश दिले. यानंतर बुधवारी दुपारपासून मजुरांचे खाते उघडण्यास प्रारंभ झाला. याबाबत मजुरांनी समाधान मानले.