शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

मनुष्याचं ‘मन’हेच खरे दैवत: संतोष तोतरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 2:35 PM

मनुष्याचे ‘मन’ हेच खरे दैवत आहे, असा अमृतमयी उपदेश संतोष तोतरे यांनी येथे दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : साधु  संतांनी ‘मन जिंकेल...तो जग जिंकेल’ असा उपदेश दिला आहे. संतांचा हा उपदेश प्रत्येकाच्या जीवना तंतोतंत लागू पडतो. ‘चिंतना’मध्येच मनुष्य जीवनाचे नंदनवन करण्याचे सामर्थ्य आहे. म्हणूनच मनुष्याचे ‘मन’ हेच खरे दैवत आहे, असा अमृतमयी उपदेश संतोष तोतरे यांनी येथे दिला.   जीवन विद्या मिशन शाखा मलकापूर शाखेच्यावतीने सदगुरू वामनराव पै यांच्या संदेशावर आधारीत ‘सुखी जीवनाची गुरूकिल्ली’ या विषयावर दोन दिवसीय प्रवचन माला स्थानिक मुक्तेश्वर आश्रमात आयोजित करण्यात आली. या प्रवचन मालेचे द्वितीय पुष्प गुंफताना संतोष तोतरे रविवारी बोलत होते.   सदगुरू वामनराव पै यांच्या तत्वज्ञानातील ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ हा धागा धरून आपले विचार व्यक्त करीत उपस्थितांना ओतप्रोत केले. सकारात्मक विचारांचे अनेक दाखले देत त्यांनी सुमारे दीडतास सभागृह अक्षरक्ष: खिळवून ठेवले. सकारात्मक विचार आणि चिंतन हीच माणसाच्या यशस्वी होण्याची खरी गुरूकिल्ली असल्याचेही त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले. अनिष्ट विचार करणारा माणुस कधीही सुखी होवू शकत नाही. त्यामुळे मनुष्याने आपल्या आयुष्यात नकारार्थी विचारांना कोठेही स्थान देता कामा नये, असेही ते शेवटी म्हणाले.  जीवनात सुख प्राप्त करण्यासाठी आपल्या अंतर्मनाची जडणघडण अत्यंत महत्वाची आहे. जीवनविद्येचे विचार आपल्या अंतर्मनात खोलवर रुजले पाहिजेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.खामगाव येथील प्रबोधन महोत्सव यशस्वी करण्यासाठी जीवन विद्या मिशन मलकापूर शाखेचे अशोक अनासने  , डॉ.प्रविण गासे, राहुल कोलते , एम.ए.सुरळकर, अजय आटोळे ,  सचिन मुंढे , अ‍ॅड.जयंत पाटील , अनिल बंड , गणेश माकोडे , चंदु भाटीया आदींनी परीश्रम घेतले.

  अनेकांनी घेतला अनुग्रह!खामगाव येथील मुक्तेश्वर आश्रमात जीवनविद्या मलकापूर शाखेच्यावतीने दोन दिवसीय प्रबोधन महोत्सव आयोजित करण्यात आला. या महोत्सवात रविवारी शेकडो भाविकांनी सदगुरू वामनराव पै यांचा अनुग्रह घेतला. खामगाव येथे नियमित संत्सग सुरू करण्याचाही संकल्प यावेळी काहींनी केला. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावAdhyatmikआध्यात्मिक