करडी तलावात एक महिना पुरेल एवढाच जलसाठा

By Admin | Updated: June 28, 2014 01:42 IST2014-06-28T01:20:50+5:302014-06-28T01:42:31+5:30

शेतीसाठी पाण्याचा उपसा सुरुच : परिसरातील आठ गावांवर पाणीटंचाईचे संकट.

Only a month's water supply in a gray lake | करडी तलावात एक महिना पुरेल एवढाच जलसाठा

करडी तलावात एक महिना पुरेल एवढाच जलसाठा

रुईखेड मायंबा : धाड परिसरातील करडी संग्राहक तलावात दरवर्षीपेक्षा यावर्षी बर्‍या प्रमाणात जलसाठा होता, परंतु जुन महिना संपत आला. तरी पावसाचा पत्ता नाही आणि शेतीसाठी धरणातून पायाचा उपसा सुरुच असल्याने करडी संग्राहक तलावातील जलसाठा झपाटयाने घसरत असून जलसंकट निर्माण होण्याच्या मार्गावर आहे.
धाड जवळ अवघ्या १ कि.मी.अंतरावर करडी संग्रह प्रकल्प असून या प्रकल्पातील पाण्याचा उपयोग जवळपासच्या गावातील शेतीसाठी होतो तसेच या प्रकल्पाच्या आजूबाजूच्या विहिरी खोदून डोमरुळ, धाड, करडी, कुंबेफळ, कुलमखेड, चांडोळ, सातगांव, सावळी आदी गावांना पिण्याचा पाण्याची व्यवस्था करण्यात आली. मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने या तलावात बर्‍यापैकी जलसाठा झाला होता. परंतु पावसाळय़ात या तलावाच्या सांडव्याला छिद्र पडल्याने पाण्याचा बराच साठा वाहून गेला. शिवाय सदर तलावातील पाणी शेतीसाठी सुध्दा मोठय़ाप्रमाणावर वापरले जात असल्याने जलसाठा सध्याच्या स्थितीत कमालीचा घटला आहे. अजून १ महिना पाडून न आल्यास पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. या तलावावर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणार्‍या विहिरीच्या पातळीवर सुध्दा घट झाली आहे.
आतापर्यंतचा इतिहास पाहता धाड परिसरातील चांडोळ व धाड या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण होत होते. पिण्याच्या पाण्यासाठी आया बहिणींना भटकंती करावी लागत होती.
मात्र या तलावामुळे ही भटकंती जरा थांबली असली तरी योग्य नियोजना अभावी यावर्षी देखील टंचाई निर्माण होण्याची चिन्हे आहेत. तसेच दरवर्षी जून महिन्यात काही प्रमाणात पाऊस पडला की गुरांना हिरवा चारा खायाला मिळत असे परंतु पाऊस लगेच कमी पडल्याने आणि लगेच उघडल्याने गुरांना हिरवा चारा सुध्दा मिळत नसल्याने त्यांना खाऊन टाकलेली उस्टाळ पुन्हा खाण्याची पाळी आली आहे. जर पाण्याचे योग्य नियोन झाले नाही तर पंधरा ते वीस हजार लोकसंख्या असलेले धाड, चांडोळ या गावांवर पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण होऊ शकते एवढे मात्र खरे.

Web Title: Only a month's water supply in a gray lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.