शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय धान्य गोदामातील सुतळीगाठीची आॅनलाइन खरेदी    

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 16:44 IST

बुलडाणा: राज्यातील शासकीय धान्य गोदामांमध्ये अन्नधान्याची पोती शिवण्यासाठी लागणाºया सुतळीगाठीची गव्हर्मेंट ई-  मोर्केटप्लेसवरून आॅनलाइन खरेदी करण्यात येत आहे.

- ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा: राज्यातील शासकीय धान्य गोदामांमध्ये अन्नधान्याची पोती शिवण्यासाठी लागणाºया सुतळीगाठीची गव्हर्मेंट ई-  मोर्केटप्लेसवरून आॅनलाइन खरेदी करण्यात येत आहे. शासकीय गोदामांना दोन महिने पुरेल एवढ्या सुतळी गाठी शासनाच्या आॅनलाइन पोर्टलद्वारे खरेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून १६ हजार ५०० रिळ धाग्याचा गोदामामध्ये पुरवठा सुरू झाला आहे. शासकीय कार्यालयातील विविध वस्तुंची खरेदी प्रक्रिया सुलभ व गतीमान व्हावी, यासाठी शासनाने सुरू केलेल्या गव्हर्मेंट ई- मार्केटप्लेस या आॅनलाइन पोर्टलवरच आता सर्व सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे विविध वस्तूंची खरेदी गव्हर्मेंट ई-  मोर्केटप्लेसवरून करण्यासाठी प्रशासनाकडून वारंवर सुचना स्थानिक कार्यालयांना येत आहेत. राज्यातील शासकीय धान्य गोदामांमाध्ये अन्नधान्याची पोती शिवण्यासाठी लागणाºया सुतळीगाठीची गव्हर्मेंट ई- मार्केटप्लेस या पोर्टलद्वारे खरेदी करण्यात येत आहे. शासकीय गोदामांमध्ये अन्नधान्याच्या पोत्यांचे प्रमाणिकरण केल्यानंतर ती शिवण्यासाठी वीज उपलब्ध असलेल्या राज्यातील ५५० गोदामांसाठी १ हजार १०० पोती शिवण यंत्रे, हँगींग हूक व शिवण यंत्रासाठी लागणारा १६ हजार ५०० रिळ धागा यांची खरेदी प्रक्रिया पुर्ण झाली आहे. त्याचा संबंधीत गोदामामध्ये पुरवठा सुरू करण्यात आला आहे. उर्वरित शासकीय गोदामांना दोन महिने पुरेल एवढ्यसा सुतळी गाठी गव्हर्मेंट ई- मार्केटप्लेस या पोर्टलवर खरेदी करण्याची प्रक्रिया पुर्ण झाली आहे. शासकीय धान्य गोदामामध्ये पोती, सुतळीगाठी वेळेवर मिळत नसल्याने येणाºया अडचणी आॅनलाइन खरेदी प्रक्रियेने दूर होत आहेत. 

तीन टक्के अनामत रक्कमखरेदी मुल्याच्या तीन टक्के अनामत रक्कम करारनाम्यासोबत धनाकर्षद्वारे वित्तीय सल्लागार व उपसचिव यांचे नावे जमा करावी लागेल, अशी तरतुद करण्यात आली आहे.  अनामत रक्कम, बँकेची कार्यवाही यासर्व प्रक्रियेनंतर ४५ दिवसाचा कालावधी लागू शकतो. त्यानंतर प्रत्यक्ष पुरवठा सुरू होऊ शकेल. यांना करावी लागणार कार्यवाहीशासकीय धान्य गोदामातील सुतळीगाठीची आॅनलाइन खरेदीची संपूर्ण कार्यवाही जिल्हा पुरवठा अधिकारी, नियंत्रक, शिधावाटप, वित्तीय सल्लागार व उपसचिव यांना करावी लागणार आहे. पुरवठादाराने सुतळी गाठींचा पुरवठा संबंधित जिल्हा गोदामामध्ये केल्यानंतर सामुग्री स्विकारणाºया जिल्हा पुरवठा कार्यालयाने त्याच दिवशी गव्हर्मेंट ई-  मोर्केटप्लेसवर आर्डर नंबर व इतर बाबी नमुद कराव्या लागणार आहेत.

शासकीय धान्य गोदामांमध्ये अन्नधान्याची पोती शिवण्यासाठी लागणाºया सुतळीगाठीची गव्हर्मेंट ई-  मोर्केटप्लेसवरून खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. आॅनलाइन पोर्टलमुळे खरेदीची प्रक्रिया सुलभ झाली आहे.- बी. यू. काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाonlineऑनलाइन