महावीर जयंतीनिमित्त ऑनलाइन कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:31 IST2021-04-26T04:31:50+5:302021-04-26T04:31:50+5:30
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोणत्याही कार्यक्रमास एकत्रित येण्यावर शासनाने निर्बंध घातलेले आहे. दरवर्षी महावीर जयंतीनिमित्त निघणारी मिरवणूक या वर्षी ...

महावीर जयंतीनिमित्त ऑनलाइन कार्यक्रम
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोणत्याही कार्यक्रमास एकत्रित येण्यावर शासनाने निर्बंध घातलेले आहे. दरवर्षी महावीर जयंतीनिमित्त निघणारी मिरवणूक या वर्षी रद्द करण्यात आली. मात्र संपूर्ण जैन समाजाच्यावतीने ऑनलाईन जयंती साजरी केली.
येथील जैन समाजाने डोणगाव येथील जैन मंदिरात ऑनलाईन एकत्र येऊन जयंती साजरा करण्यात आली. यात गावातीलच नव्हे तर व्यवसाय, नोकरीनिमित्त बाहेर असलेले जैन बांधवदेखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते. मंदिरात सकाळी सव्वासात वाजता सर्व जीवांच्या सुखसमृद्धी, शांतीकरिता व कोरोना रोग लवकर जावो म्हणून अभिषेक व भगवंताची शांतिधारा पूजा करण्यात आली. महावीर भगवंताची पूजा झाल्यावर श्रविकांनी भगवान महावीरांचा पाळणा व मंगल गीत गायले.
या वेळी उपस्थित असलेल्या जि.प. कृषी सभापती राजेंद्र पळसकर यांनी लाल दगडात जीर्णोद्धार होत असलेल्या मंदिराच्या कामाला ३१ हजाराची देणगी दिली. मंदिरासमोर हायमास्ट लाईट बसवण्याच्या कामाचे भूमिपूजन केले.
शासनाने लावलेल्या निर्बंधांनुसार सर्व नियमांचे पालन करत हा कार्यक्रम घेण्यात आला.