काँग्रेस कमिटीच्या विस्तारित कार्यकारिणीची ऑनलाइन बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:04 IST2021-03-04T05:04:37+5:302021-03-04T05:04:37+5:30

बैठकीच्या सुरुवातीला दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांना तसेच मलकापूर शहर काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष पंडितराव ...

Online meeting of the extended executive of the Congress Committee | काँग्रेस कमिटीच्या विस्तारित कार्यकारिणीची ऑनलाइन बैठक

काँग्रेस कमिटीच्या विस्तारित कार्यकारिणीची ऑनलाइन बैठक

बैठकीच्या सुरुवातीला दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांना तसेच मलकापूर शहर काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष पंडितराव देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या बैठकीत माजी आ. दिलीप कुमार सानंदा, संजय राठोड, श्याम उमाळकर, लक्ष्मणराव घुमरे, रामविजय बुरंगले, अनिल खाकरे, स्वातीताई वाकेकर, नंदूभाऊ बोरे, ज्योतीताई ढोकणे, ॲड. मोहतेश्याम रजा, अविनाश उमरकर, गजानन खरात, रमेश घोलप आदींनी मनोगत व्यक्त केले.

बैठकीत मांडले ठराव

काँग्रेसच्या या बैठकीत सहा ठराव मांडण्यात आले. नगर परिषद व नगर पंचायत निवडणूक २०२१ च्या अनुषंगाने, ‘घराघरांत काँग्रेस, मनामनांत काँग्रेस’ ह्या ब्रीद वाक्याने जिल्ह्यातील प्रत्येक नगरपालिका व नगरपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा लावण्याचे संकल्प अभियान ठराव, पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस सिलिंडर यांच्या वाढीव किमती व केंद्र सरकारच्या निष्क्रिय भूमिकेचा निषेध ठराव आदी ठराव संमत करण्यात आले.

Web Title: Online meeting of the extended executive of the Congress Committee