ऑनलाइन सात-बारामध्ये बुलडाणा जिल्हा राज्यात पाचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:08 IST2017-08-02T02:08:28+5:302017-08-02T02:08:42+5:30

बुलडाणा  : केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोगाम अंतर्गत शेतकर्‍यांना शेतीविषयक सर्व रेकॉर्ड ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी ई-फेरफार, ई-चावडी सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे.

Online fifth in Buldhana district of the seven-twelve online | ऑनलाइन सात-बारामध्ये बुलडाणा जिल्हा राज्यात पाचवा

ऑनलाइन सात-बारामध्ये बुलडाणा जिल्हा राज्यात पाचवा

ठळक मुद्दे ई-फेरफार, ई-चावडी सॉफ्टवेअर विकसितदुय्यम निबंधक कार्यालयात झालेल्या दस्ताची नोंद तलाठी रेकॉर्डला ऑनलाइन

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा  : केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोगाम अंतर्गत शेतकर्‍यांना शेतीविषयक सर्व रेकॉर्ड ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी ई-फेरफार, ई-चावडी सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. त्यानुसार राज्यात ई-फेरफार आज्ञावलीद्वारे दुय्यम निबंधक कार्यालयात झालेल्या दस्ताची नोंद तलाठी रेकॉर्डला ऑनलाइन होत आहे. यामध्ये युटिलिटीचा उपयोग करून हस्तलिखित सात-बारा व ऑनलाइन सात-बारा तंतोतत जुळविण्याचे जिल्ह्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे जिल्हा राज्यामध्ये पाचव्या क्रमांकावर असून, जिल्ह्याचे एडिट मॉड्युलचे ९९.६१ टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ललित वराडे, उपजिल्हाधिकारी (महसूल)  नम्रता चाटे, उपविभागीय अधिकारी नरेंद्र टापरे आदी उपस्थित होते.
 ई-चावडीची माहिती देताना जिल्हाधिकारी म्हणाले, शेतीविषयक तलाठी रेकॉर्डला असलेले १ ते २१ गाव नमुने ऑनलाइन अद्ययावत होणार आहेत. त्यासंबंधीच्या नोंदीसुद्धा ऑनलाइन जतन करून ठेवल्या जाणार आहेत. चावडी वाचन मोहिमेद्वारे सात-बारा तंतोतंत जुळविण्याचे काम करण्यात आले.
जिल्ह्यात एकूण ५ लाख ४0 हजार ५५७ ऑनलाइन सात-बारा तंतोतंत आहेत. शेतकर्‍यांना सात-बारा ऑनलाइन परीक्षण करण्यासाठी संकेतस्थळावर पाहता येणार आहे. जिल्ह्यातील १४८५ गावांमध्ये चावडी वाचनाची मोहीम राबविण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान मालगणी, मोताळामधील वाघजाळ व शेगाव तालुक्यातील चिंचोली येथे भेट देण्यात आली असल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकारी पुलकुंडवार यांनी दिली. 
 

Web Title: Online fifth in Buldhana district of the seven-twelve online