जिल्हास्तरीय नारीशक्ती पुरस्कारचे ऑनलाइन वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:34 IST2021-04-18T04:34:31+5:302021-04-18T04:34:31+5:30
राहेरी बु. येथे कार्यरत असलेल्या शिक्षका गोदावरी जगन्नाथ तांबेकर यांनी पहिली ते दहावी वर्गासाठी सर्व विषयांवर आधारित ८४० ...

जिल्हास्तरीय नारीशक्ती पुरस्कारचे ऑनलाइन वितरण
राहेरी बु. येथे कार्यरत असलेल्या शिक्षका गोदावरी जगन्नाथ तांबेकर यांनी पहिली ते दहावी वर्गासाठी सर्व विषयांवर आधारित ८४० व्हिडिओ निर्मिती केली आहे. त्यावर त्यांनी पहिली ते दहावी या वर्गासाठी विषय मराठी व सेमी इंग्रजी माध्यमातून १३०० ऑनलाइन टेस्ट निर्माण केल्या आहेत. उपक्रमशील शिक्षिका म्हणून त्यांना नारीशक्ती पुरस्कार सन्मान मिळाला आहे. सर फाउंडेशन व वूमन टीचर्स फोरम यांच्या वतीने जिल्हास्तरीय नारीशक्ती पुरस्कारचे वितरण करण्यात आले. ऑनलाइन पुरस्कार वितरण डायटचे प्राचार्य विजयकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख उपस्थितीमध्ये प्रा. सुजाता भालेराव, हेमा शिंदे-वाघ, सिद्धाराम माशाळे, बाळासाहेब वाघ, राजकिरण चव्हाण, हसन कुरेशी, किशोर भागवत, कल्पना माने हे होते.