शेतक-यास मारहाणप्रकरणातील आरोपींना एक वर्षाची शिक्षा
By Admin | Updated: October 15, 2014 00:44 IST2014-10-14T23:22:49+5:302014-10-15T00:44:54+5:30
२0१२ मधील घटना; लोखंडी गज व कु-हाडीच्या दांड्याने केली होती मारहाण.

शेतक-यास मारहाणप्रकरणातील आरोपींना एक वर्षाची शिक्षा
बुलडाणा : शेतातून परत येणार्या शेतकर्यास लोखंडी गजाने मारहाण करणार्या दोन आरो पींना एक वर्ष कारावासाची शिक्षा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. डी. सोनी यांनी सुनावली आहे. बुलडाणा शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या दहिद बुद्रुक येथील रामकृष्ण उत्तमराव राऊत हे २९ सप्टेंबर २0१२ रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास शेतातील कामकाज आटोपून घरी परत येत होते. त्याच वेळी गावातील आरोपी कौतिकराव काशीराम देवकर, गणेश काशीराम देवकर व काशीराम देवराव देवकर यांनी रामकृष्ण राऊत यांच्याशी वाद घालून त्यांना लोखंडी गज व कुर्हाडीच्या दांड्याने मारहाण केली. राऊत यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी आरोपींविरु द्ध गुन्हा दाखल केला होता. पोलिस हेडकॉन्स्टेबल दिलीप पवार यांनी मारहाण प्रकरणाचा तपास करून प्रकरण न्यायालयात प्रविष्ट केले. यावेळी सरकारी पक्षाच्या वतीने आठ साक्षीदार तपासण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने फिर्यादी व इतर साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. डी. सोनी यांनी आरोपी गणेश देवकर व काशीराम देवकर यांना प्र त्येकी एक वष्रे साध्या कारावासाची शिक्षा व एक हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास दोन महिन्यांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षाच्या वतीने अँड. मो. बशीर मो. नशीर यांनी काम पाहिले.