मारहाणप्रकरणी आरोपींना एक वर्षाची शिक्षा
By Admin | Updated: January 23, 2015 01:50 IST2015-01-23T01:50:03+5:302015-01-23T01:50:03+5:30
मलकापूर येथील मारहाण प्रकरण.
_ns.jpg)
मारहाणप्रकरणी आरोपींना एक वर्षाची शिक्षा
मलकापूर (जि. बुलडाणा): मारहाणप्रकरणी चौघांना येथील न्यायालयाने आज, २२ जानेवारी रोजी एक वर्षाची शिक्षा व दंड ठोठावला आहे.
घटना तालुक्यातील नरवेल येथील खंडोबा यात्रेत ९ जानेवारी २0१२ रोजी घडली होती. या घटनेत गणेश वसंत थोरात, गजानन छगन धाडे, सुभाष शालीग्राम न्हावकर यांना विनोद समाधान चव्हाण, तारासिंग अमरसिंग चव्हाण, अनिल मोहन चव्हाण, अशोक पुंजाजी चव्हाण यांनी मारहाण केली होती. याबाबतची फिर्याद ग्रामीण पो.स्टे. मध्ये गणेश वसंत थोरात यांनी दिली होती. या फिर्यादीवरुन पोलिसांनी उपरोक्त चार जणांविरुद्ध कलम ३२४, ५0४, ५0६ (२) आर डब्ल्यू ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला होता, तर तपासाअंती प्रकरण येथील प्रथम वर्ग न्यायालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात साक्षीपुराव्यानंतर आज न्यायाधीश डी.पी.कासट यांनी चारही आरोपींना एक वर्षे कठोर शिक्षा व प्रत्येकी ३000 रुपये दंड. दंड न भरल्यास दोन महिने शिक्षा सुनावली. यातील दंडाच्या भरलेल्या रकमेपैकी गणेश वसंत थोरात, गजानन छगन धाडे, सुभाष शालीग्राम न्हावकर यांना प्रत्येकी दोन-दोन हजार द्यावयाचे, असा निकाल न्या. डी.पी. कासट यांनी दिला. सरकार पक्षातर्फे अँड.तुषार उदयेकार यांनी कामकाज पाहिले.