एक हजारांवर मंदिरे, प्रार्थना स्थळे अवैध

By Admin | Updated: January 14, 2015 23:52 IST2015-01-14T23:52:30+5:302015-01-14T23:52:30+5:30

बुलडाणा जिल्ह्यात एक हजारांवर धार्मिक स्थळे अतिक्रमीत जागेवर; अवैध धार्मिक स्थळ पाडण्याचे उच्च न्यायालयाचे निेर्देश.

One thousand temples, prayer places illegal | एक हजारांवर मंदिरे, प्रार्थना स्थळे अवैध

एक हजारांवर मंदिरे, प्रार्थना स्थळे अवैध

बुलडाणा : जिल्हाभरात रस्त्यांच्या कडेला तसेच अतिक्रमित जागांवर तब्बल एक हजार १६४ विविध धर्मांची व पंथांची मंदिरे तसेच प्रार्थना स्थळे आहेत. यातील नियमित व अनियमित स्थळांची यादी तयार करण्यात आली असून, २७ स्थळांना स्थलांतरीत करण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे आलेला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता असे अतिक्रमित धार्मिक स्थळे पाडण्याची कारवाई हाती घेतली जाणार आहे.
अवैध धार्मिक स्थळे पाडण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाची आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रस्त्यांच्या कडेला वा पदपथावर मंदिरे, मशिदी व बुद्धविहार तसेच विविध धार्मिक स्थळे उभारण्यात आली आहेत, यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो. अशी स्थळे प्रामुख्याने हटविण्यात येणार आहेत.
न्यायालयाने दोन वर्षांंपूर्वी अवैध धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील अवैध धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात ११६४ धार्मिक स्थळे सरकारी जागांवर तसेच रस्त्यांच्या कडेला असल्याचे आढळून आलीे होती. शहरी भागात १ हजार १४ तर ग्रामीण भागात १५0 धार्मिक स्थळांचे अवैध निर्माण कार्य झालेले आहे. ज्या जागांवर असे धार्मिक स्थळे उभारली आहेत त्या जागा ज्या विभागांच्या आहेत त्यांनी असे अवैध निर्माण कार्य करणार्‍यांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या. यावर १५ दिवसात स्पष्टीकरण मागवून त्यावर सुनावणी घेण्यात आली होती; मात्र अजूनही असे अनधिकृत धार्मिक स्थळे कायमच आहेत.
बुलडाण्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीची २३ जुलै २0१४ रोजी बैठक घेण्यात आली होती. या बैठकीच्या शिफारसीनुसार एक हजार १६४ धार्मिक स्थळे असल्याची बाब समोर आली आहे. यासंदर्भात आता राज्यशासनाकडून निर्देश प्राप्त होताच कारवाई केली जाणार आहे.
यासंदर्भात नायब तहसीलदार आर एन देवकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत उच्च न्यायालयाचा निर्णय झाला असल्याचे स्पष्ट केले. या निर्णयानुसार शासनाकडून पुढील कार्यवाहीसाठी निर्देश प्राप्त होताच प्रशासन कार्यवाही सुरू करेल, असे त्यांनी सांगीतले.

Web Title: One thousand temples, prayer places illegal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.