आमदार दत्तक ग्राम योजनेत एक पाऊल पुढे
By Admin | Updated: October 12, 2015 01:11 IST2015-10-12T01:11:01+5:302015-10-12T01:11:01+5:30
आदर्श ग्रामला आमदार दत्तक ग्रामची जोड; आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरणावरही देणार भर.

आमदार दत्तक ग्राम योजनेत एक पाऊल पुढे
सुधीर चेके पाटील /चिखली (जि. बुलडाणा) : देश सुधारायचा असेल, तर त्याची सुरुवात गाव-खेड्यां पासून करायला हवी, याची जाणीव असलेले चि खलीचे आमदार राहुल बोंद्रे यांनी राज्य शासनाच्या आमदार दत्तक ग्राम ही संकल्पना राबविण्याच्या आधी पासूनच तालुक्यातील खोर हे गाव विकासासाठी दत्तक घेतले. या गावाचा संपूर्ण कायापालट करून एक समृद्ध गाव बनविण्यासोबतच आदर्श ग्रामचा लौकिकदेखील खोर या गावास मिळवून दिला आहे. आमदार दत्तक ग्राम ही संकल्पना आ. बोंद्रे आमदारकीला पहिल्यांदा निवडून आल्यापासून राबवत आहेत. याच अंतर्गत त्यांनी दत्तक घेतलेले तालुक्यातील १५00 लोकवस्तीचे खोर हे गाव आज सर्व सुविधांनी समृद्ध आहे. सन २00९ मध्ये राज्याची ह्यआदर्श ग्राम योजनाह्ण ही गावांच्या विकासासाठी अधिक प्रभावी ठरू शक ते, हे जाणून ग्रामस्थांना एकजूट करून सर्वप्रथम गावात स्वच्छतेविषयी आमदारांनी प्रोत्साहन दिले. गावातील कचर्याची होळी करण्यात आली. अंतर्गत रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन, नाल्या, पिण्याच्या पाण्याची समस्या, जलसंधारणाची कामांचे योग्य नियोजन आदी बाबी ग्रामस्थांनी आ. बोंद्रेंच्या मार्गदर्शन व सक्रिय सहभाग देऊन मार्गी लावल्या. दरम्यान, अंदाजपत्रकानुसार मंजूर निधीला लोकसहभागाची जोड देऊन अनेक कामे पूर्णत्वास नेण्यात आली. या योजनेंतर्गत गावास १ कोटी ३ लाख रुपये मंजूर झाले असून, या निधीतून १८ लाख रुपये किमतीचे अं तर्गत रस्ते, १0 लाख रुपयांतीन स्मशानभूमी सुशोभीकरण तसेच पाणलोट योजनेची कामे प्रगतिपथावर आहेत. जिल्हा परिषद अंतर्गत सांडपाणी व्यवस्थापनासाठी १२ लाख रुपयेदेखील गावास मंजूर झाले आहेत. याशिवाय येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत १00 टक्के ई-लर्निंंग प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. गावातील एकूण २६७ कुटुंबांपैकी २५0 कुटुंबांकडे शौचालय असून, उर्वरित कुटुंबांकडील शौचालयाचे काम पूर्णत्वास गेले असून, लवकरच संपूर्ण हगणदरीमुक्त गाव म्हणूनही लौकिक प्राप्त होणार आहे.
*हगणदरीमुक्तीसाठी आत्मक्लेश.
दत्तक ग्राम खोर आदर्श गाव म्हणून मागील काही वर्षांंपासून समोर आले. या गावापासून प्रेरणा घेत म तदारसंघातील १८ गावे आ. बोंद्रेच्या पुढाकारातून आदर्श ग्राम होण्यासाठी सरसावली आहेत. असे असताना खोर हे १00 टक्के गाव हगणदरीमुक्त झालेले नव्हते. गावातील प्रत्येक घरात शौचालय असावे, यासाठी आग्रही असलेले आ. बोंद्रे यांनी सातत्याने दोन वर्षांंपासून प्रयत्न केली आहे.