समृद्धीच्या पुलावरून तोल जावून गोंदियातील एकाचा मृत्यू

By निलेश जोशी | Published: April 3, 2024 08:43 PM2024-04-03T20:43:34+5:302024-04-03T20:44:12+5:30

सुरेंद्र हौशीलाल माहुरे (४५) हे त्यांच्या नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराच्या कामासाठी पुणे येथे जात होते.

One person died in Gondia after falling from Samriddhi Bridge | समृद्धीच्या पुलावरून तोल जावून गोंदियातील एकाचा मृत्यू

समृद्धीच्या पुलावरून तोल जावून गोंदियातील एकाचा मृत्यू

दुसरबीड: समृद्धी महामार्गावर २ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील बोथा पोस्ट अंतर्गत येत असेलल्या सुरेंद्र हौशीलाल माहुरे याचा पुलाच्या कठड्यावरून तोल जावून खाली पडल्याने मृत्यू झाला. ही घटना दुसरबीड टोल नाक्याजवळ घडली.

सुरेंद्र हौशीलाल माहुरे (४५) हे त्यांच्या नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराच्या कामासाठी पुणे येथे जात होते. दुसरबीड टोल नाक्याच्या पश्चिमेस चानेल क्रमांक ३१९ वर तढेगाव शिवारामध्ये समृद्धी महामार्गावरील पुलाजवळ पाठीमागून येणाऱ्या वाहनाची वाट पहात थांबले होते. रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास अंधारामुळे कडेला पाणी पीत असतांना पुलाच्या कठड्यावरून त्यांचा तोल गेला व ते पुलाखाली पडले. यात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती सोबत असलेले धनराज हंसराज मनकर (६२, रा.कोयली, ता.तिरोडा, जि. गोंदिया) यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास किनगाव राजा पोलिस करत आहेत.

Web Title: One person died in Gondia after falling from Samriddhi Bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.