शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील १ लाख ८० हजार शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 19:14 IST

आॅनलाईन अर्ज प्रक्रियेनंतर प्राप्त याद्यांची छाननी करून बनविण्यात आलेल्या ग्रीन याद्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील २ लाख २२ हजार ३०९ शेतकरी पात्र ठरले असून, यातील १ लाख ८० हजार शेतकर्यांना सरसकट दीड लाखापर्यंतची कर्जमाफी देण्यात आली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील दोन लाख २२ हजार शेतकरी कर्जमाफीस पात्र

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थातच ऐतिहासिक कर्जमाफी योजनेतंर्गत जिल्ह्यातील दोन लाख २२ हजार ३०९ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. आॅनलाईन अर्ज प्रक्रियेनंतर प्राप्त याद्यांची छाननी करून बनविण्यात आलेल्या ग्रीन याद्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील दोन लाख २२ हजार ३०९ शेतकरी पात्र ठरले असून यातील एक लाख ८० हजार शेतकर्यांना सरसकट दीड लाखापर्यंतची कर्जमाफी देण्यात आली आहे.

सोबतच (ओटीएस) एकरकमी योजनेतंर्गत ४१ हजार ५१८ शेतकर्यांना कर्जमाफी मिळाली आहे. अशाप्रकारे एकरकमी व सरसकट कर्जमाफीचा विचार करता जिल्ह्यातील दोन लाख २२ हजार ३०९ शेतकरी कर्ज माफीसाठी पात्र ठरले आहे. यासाबेतच जिल्ह्यात प्रोत्साहनपर अनुदानही देण्यात आले असल्याची माहिती सुत्रांनी दिली. या योजनेतंर्गत राज्यात साधारणत: ४१ लाख शेतकर्यांच्या कर्जमाफीसाठी १९ हजार कोटी रुपयांची रक्कम बँकांकडे वर्ग करण्यात आली आहे.  कर्जमाफीसाठी ७७ लाख अर्ज राज्यभरातून प्राप्त झाले होते. छाननी करण्यात आल्यानंतर डुप्लिकेशन झालेले खाते दूर करुन ६९ लाख खात्यांवर कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यापैकी जवळपास ४१ लाख खात्यांमध्ये कर्जमाफीचे अनुदान देण्यासाठी राज्य शासनाकडून बँकांकडे १९ हजार कोटी रुपयांचा निधी हस्तांतरीत करण्यात आला आहे. दरम्यान, शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने शेतजमिनीची अट न ठेवता कर्जमाफी योजना जाहीर केली आहे.बुलडाणा तालुक्यातील रुईखेड टेकाळचे नारायण देशमुख या अल्पभूधारक शेतकर्याचे जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे १७ हजार २०० रुपयांचे थकीत कर्ज माफ करण्यात आले आहे. तसा एसएमएसही त्यांना आला आहे. भादोला येथील अनिल भालेराव यांचेही सहकारी बँकेचे ७७ हजार रुयांचे कर्जमाफ झाले आहे. दरम्यान, रुईखेड येथील श्रीधर टेकाळे यांचेही एक लाख २० हजार २४३ रुपयांचे थकीत कर्ज होते. तेही या प्रक्रियेत माफ करण्यात आले आहे. इसापूर येथील शेतकर्याचेही कर्ज माफ झाले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरीState Governmentराज्य सरकार