एक लाखाचे दागिने पळविले
By Admin | Updated: May 9, 2015 01:51 IST2015-05-09T01:51:16+5:302015-05-09T01:51:16+5:30
धाड बसस्थानकावरील घटना ; महिलावर्गात दहशत.

एक लाखाचे दागिने पळविले
धाड : एसटी बसमध्ये चढणार्या एका विवाहीत महिलेच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने चार तोळे सोन्याची पोत व ४ हजार रु. रोख रक्कम पळवल्याची घटना घडली असून, या घटनेमुळे महिलांमध्ये घबराहट निर्माण झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, मंदा कैलास बरडे रा.औरंगाबाद या आपल्या माहेरी बोरखेड येथे आई- वडिलांकडे आल्या होत्या. ७ मे रोजी त्या आपल्या गावाकडे परत चालल्या होत्या. धाडच्या बस स्टॅण्डवर औरंगाबाद बसमध्ये मंदा बरडे चढत असताना यावेळी अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत त्यांचे पर्समधील अंदाजे चार तोळे सोन्याची पोत व रोख चार हजार रु. असा १ लाख ५ हजाराचा ऐवज चोरट्यांनी पळवला आहे. यापूर्वीही बस स्टॅण्डमधून अनेकांच्या पाकीटमारी व चोरीच्या घटना घडल्या आहेत; परंतु अद्या पपर्यंंत पोलिसांना चोरट्यांना जेरबंद करण्यात यश मिळाले नाही. परिणामी, या घटनेमुळे महिलावर्गात दहशतीचे वातावरण पसरले आहे. सध्या लग्नसराई सुरू असल्याने चोरीच्या घटना घडण्याची जास्त शक्यता आहे; मात्र याबाबत स्थानिक पोलिसांनी कुठलीच खबरदारी घेतलेली दिसत नाही. याप्रकरणी संबंधित महिलेच्या भावाने धाड पोलिसात यासंदर्भात तक्रार दिली आहे; मात्र अद्याप पर्यंत धाड पोलिसात या घटनेची कुठलीच नोंद घेण्यात आलेली नव्हती, हे विशेष.