लोकमत न्यूज नेटवर्कवरवट बकाल : शेगाव ते वरवट बकाल मार्गावर शनिवारी पहाटे अज्ञात वाहनाने २३ वर्षीय दुचाकीस्वाराला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.वरवट बकाल येथील युवक उमेश महादेव वानरे हा युवक एमएच-२८-बी.एफ-५३१५ दुचाकी घेवून घरातून निघाला होता. शनिवारी पहाटे वरवट बकाल ते शेगाव मार्गावरील मनार्डी फाट्या जवळ तो मृतअवस्थेत आढळला. तामगाव पोलिसांनी पंचनामाकरून मृतदेह शवविच्छेदनासाठी वरवट बकाल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. प्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास तामगाव पोलीस ठाण्यातील बिट जमादार करीत आहेत. मृत युवकाच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, तीन बहिणी असा बराच आप्त परिवार आहे. दरम्यान, या प्रकरमात घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.(वार्ताहर)
अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 11:12 IST