अमडापूर: रस्त्या लगत नादुरुस्त झाल्यामुळे उभ्या असलेल्या ट्रकवर दुचाकी आदळून दोन आॅक्टोबर रोजी गंभीर जखमी झालेल्या दुचाकी चालकाचा उपचारा दरम्यान तीन आॅक्टोबर रोजी रुग्णालयात मृत्यू झाला. हा अपघात दोन आॅक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दहीगाव फाट्यानजीक घडला होता.या अपघातामध्ये संजय पांडुरंग सोनोने (४८, रा. अमडापूर) हे ठार झाले आहेत. दोन आॅक्टोबर रोजी दुचाकीवर अमडापूरवरून चिखलीकडे जातांना दहीगाव फाट्यानजीक बादल हरिदयाल शुक्ला (रा. छिंदवाडा, मध्यप्रदेश) याने त्याचा नादुरुस्त झालेला ट्रक (सीजी-०४-जेडी-५६८१) हा रस्त्याच्या मधोमधच उभा केला होता. त्यामुळे दुचाकीवर जात असलेले संजय पांडुरंग सोनोने दुचाकीसह त्या ट्रकवर आदळले व गंभीर जखमी झाले. औरंगाबाद येथील रुग्णालयात ३ आॅक्टोबरला त्यांचा मृत्यू झाला.
ट्रक-दुचाकी अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 13:03 IST