ट्रक व जीपच्या अपघातात एक ठार

By Admin | Updated: May 14, 2017 03:57 IST2017-05-14T03:57:02+5:302017-05-14T03:57:02+5:30

खामगाव- जालना राज्य महामार्गावरील घटना.

One killed in truck and Jeep crash | ट्रक व जीपच्या अपघातात एक ठार

ट्रक व जीपच्या अपघातात एक ठार

देऊळगाव राजा : खामगाव- जालना राज्य महामार्गावरील खडकपूर्णा नदीच्या पुलाजवळ शुक्रवारी रात्री १0.३0 वाजताच्या सुमारास ट्रक व जीपच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एक जण ठार झाला.
चिखलीकडून देऊळगाव राजाकडे जाणारा एम.एच.१0 ए.क्यू. ३६0२ ट्रक व जालनावरून बुलडाणा जिल्ह्यातील गुळभेली येथे जाणार्या एम.एच.२१ ए.एक्स.२४८१ जीपची समोरासमोर धडक झाली. यामध्ये रोहिदास दलसिंग पवार (वय ३६ रा. जालना घाटी परिसर) यांचा देऊळगावमही ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करताच मृत्यू झाला, तर लवकेश मधुकर राठोड (वय १८ रा.जालना) याला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहेत. जीपमध्ये अडकलेल्या जखमींना पो.हे.कॉ. गजानन इंगळे, पो.कॉ. संदीप बालोद, सुसर, मोरे यांनी कॅबिन तोडून बाहेर काढले.

Web Title: One killed in truck and Jeep crash