अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार, एक गंभीर

By Admin | Updated: January 19, 2017 02:36 IST2017-01-19T02:36:24+5:302017-01-19T02:36:24+5:30

चिखली तालुक्यातील घटना.

One killed, one seriously injured in an unknown vehicle | अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार, एक गंभीर

अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार, एक गंभीर

चिखली, दि. १८- तालुक्यातील खंडाळा मकरध्वज येथून चिखलीकडे दुचाकीने येत असताना एका अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील वळती येथील एक युवक जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना १७ जानेवारीच्या रात्री १0 वाजेच्या सुमारास घडली आहे. या अपघातातील गंभीर जखमी युवकावर औरंगाबाद येथे उपचार सुरू आहेत.
तालुक्यातील वळती येथील अंकुश तेजराव यंगड वय २७ वष्रे व त्याचा मित्र सुशिल हिवाळे हे दोघे जण पल्सर एम.एच.२८ ए.पी.१६२६ क्रमांकाच्या दुचाकीने खंडाळा म. येथील नातेवाइकांकडे गेले होते. रात्री १0 वाजेच्या सुमारास वळती या गावाकडे परत येत असताना चिखली खंडाळा म. मार्गावर शहरापासून सुमारे सहा कि.मी अंतरावर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. यामध्ये मोटारसायकलवरील अंकुश यंगड याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर सुशिल हिवाळे हा गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी जखमीला स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. येथील प्रथमोपचारानंतर त्यास बुलडाणा येथे हलविण्यात आले; मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे.

Web Title: One killed, one seriously injured in an unknown vehicle