कंटेनरच्या धडकेत एक ठार, एक गंभीर
By Admin | Updated: October 28, 2016 02:43 IST2016-10-28T02:43:38+5:302016-10-28T02:43:38+5:30
दुसरबीड येथील घटना.

कंटेनरच्या धडकेत एक ठार, एक गंभीर
दुसरबीड, दि. २७- येथून सिंदखेड राजाकडे जाणार्या कंटेनरने दुसरबीड बस थांब्याकडे येणार्या दुचाकीला धडक दिल्याने एक युवक जागीच ठार झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला.
दुसरबीड येथील गादीघरसमोर दुपारी तीन वाजता ही घटना घडली. यामध्ये संदीप प्रल्हाद सरदार (२७) हा जागीच ठार झाला, तर जितू संपत गवई (३३) रा.दुसरबीड हा गंभीर जखमी झाला. त्यास उपचारार्थ जालना येथे हलविण्यात आले आहे.